कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीचा प्रसंग ट्विटरवर शेअर केला आहे. Jitendra Awhad Sharad Pawar

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल
जितेंद्र आव्हाड शरद पवार
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 11:17 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीचा प्रसंग ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांनी त्यांना विचारेल्या प्रश्नाची माहिती दिली आहे. हा प्रश्न टाटा कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांच्या मुक्कामाची सोय व्हावी म्हणून देण्यात येणाऱ्या घरांबद्दलचा होता. (Jitendra Awhad share experience of meeting with Sharad Pawar)

जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं ट्विट काय?

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी रविवारी झालेल्या संवादाची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला.” शरद पवार यांच्या या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत.”

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट

शरद पवार यांच्यावर गेल्या महिन्यात दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नव्हते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांच्या कामाला पहिल्यासारखी सुरुवात करतील, असं ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं होतं. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाला यापूर्वीचं हरवलेलं आहे. त्यामुळे आताच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे त्यांनी कॅन्सर पिडीतांच्या नातेवाईकांच्या व्यवस्थेसाठी टाटाला देण्यात येणाऱ्या खोल्यांबाबतची विचारपूस करणं स्वाभाविक आहे.

म्हाडा टाटा कॅन्सर हॉस्पिटलला 100 प्लटस देणार

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचं आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने त्यांचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही

कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपऱ्यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या 200 होईल. प्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 7 दिवसांत झाली याचा गर्व असल्याचं यावेळी आव्हाड म्हणाले होते. म्हाडाने प्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाचे असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

Maharashtra Coronavirus LIVE Update : एकीकडे मोदीजींकडून महाराष्ट्राचं कौतुक, दुसरीकडे प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं : रुपाली चाकणकर

(Jitendra Awhad share experience of meeting with Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.