थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून 'म्हाडा'ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणाच आज जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स
म्हाडाचे 100 फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:46 PM

मुंबई : मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकद्या रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचं आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणाच आज जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.(MHADA announces 100 flats to Tata Cancer Center)

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज टाटा रुग्णालयाचे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी टाटा रुग्णालयापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे 100 फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देत असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं. दरम्यान, आव्हाड यांनी ही संकल्पना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर आज हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.

‘कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही’

कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपऱ्यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या 200 होईल. प्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 7 दिवसांत झाली याचा गर्व असल्याचं यावेळी आव्हाड म्हणाले. म्हाडाने प्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाचे असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केलाय.

टाटा रुग्णालयाकडून आव्हाड आणि म्हाडाचे आभार

टाटा रुग्णालयात 39 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील तर 61 टक्के रुग्ण देशभरातून आलेले असतात. दरवर्षी 80 हजार रुग्ण टाटा रुग्णालयात उपचारासाठी येतात. दररोज 300 रुग्णांची विनंती असते की आमची राहण्याची सोय करा. पण सर्वांची सोय करणं आम्हाला शक्य होत नाही. पण आता आम्हाला रुग्णांची मदत करता येईल. त्यामुळे म्हाडा आणि आव्हाड यांचे आभार. आम्हाला जागा मिळाल्यावर 1 हजार रुग्णांची मदत आम्ही करु शकू, असं टाटा रुग्णालयाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी बोलताना सांगितलं.

संबंधित बातम्या :

आता ठाण्यातही टाटा कॅन्सर हॉस्पिटल, एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न सुरु

औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारचा नवा निर्णय, जालन्यातही रुग्णालय उघडणार

MHADA announces 100 flats to Tata Cancer Center

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.