काँग्रेसच्या उमेदवार यादीने विशाल मुत्तेमवार यांचा पोपट झाला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नागपूर/चंद्रपूर: राजकारणात एखाद्या व्यक्तीचा किंवा नेत्याचा पोपट होणे, हा काही नवा प्रकार नाही. अशीच घटना नागपुरातही घडली. काँग्रेसची चंद्रपूरमधून उमेदवारी मिळाली, असा दावा करत माजी मंत्री विलास मुत्तेमवारांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार यांचा मोठा सत्कार करण्यात आला. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत चंद्रपूरची उमेदवारी मिळाल्याचा दावा केला. पण काँग्रेसनं चंद्रपूरची उमेदवारी विनायक बांगडे यांनी जाहीर केल्याने विशाल मुत्तेमवार […]

काँग्रेसच्या उमेदवार यादीने विशाल मुत्तेमवार यांचा पोपट झाला
Follow us on

नागपूर/चंद्रपूर: राजकारणात एखाद्या व्यक्तीचा किंवा नेत्याचा पोपट होणे, हा काही नवा प्रकार नाही. अशीच घटना नागपुरातही घडली. काँग्रेसची चंद्रपूरमधून उमेदवारी मिळाली, असा दावा करत माजी मंत्री विलास मुत्तेमवारांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार यांचा मोठा सत्कार करण्यात आला. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत चंद्रपूरची उमेदवारी मिळाल्याचा दावा केला. पण काँग्रेसनं चंद्रपूरची उमेदवारी विनायक बांगडे यांनी जाहीर केल्याने विशाल मुत्तेमवार यांचा पोपट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

चंद्रपूर का नेता कैसा हो, विशाल मुत्तेमवार जैसा हो!… नागपूर विमानतळावर 19 मार्चच्या रात्री हा सीन पाहायला मिळाला. काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळाली म्हणून, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांचा सत्कार करण्यात आला. आपल्याला उमेदवारी मिळाल्याचं सांगत, विशाल मुत्तेमवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं आभारंही मानलं.

नागपूर विमानतळावर विशाल मुत्तेमवार यांचा सत्कार झाला. चंद्रपूरची उमेदवारी विशाल यांना मिळाल्याची सर्वत्र चर्चाही रंगली होती. पण काँग्रेसनं गुगली टाकली. चार दिवस चंद्रपूरची उमेदवारीच जाहीर झाली नाही. आणि पाचव्या दिवशी काँग्रेसची सातवी यादी लागली. पण त्यात चंद्रपूरसाठी विशाल मुत्तेमवार यांचं नाव कुठंही नव्हतं, त्यांच्या ठिकाणी काँग्रेसनं विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली आणि विशाल मुत्तेमवारांचा पोपट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

विशाल मुत्तेमवार तरुण नेते, त्यांचे वडील विलास मुत्तेमवार यांनी काँग्रेसची कारकीर्द गाजवली. पण विशाल मुत्तेमवार यांना काँग्रेसची संस्कृती अजून कळाली नाही, असाच हा प्रकार. कारण जोपर्यंत घोषणा होत नाही, तोपर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवारी निश्चित नसते, हाच दिग्गज काँग्रेस नेत्यांचा अनुभव आहे. आधीच विशाल मुत्तेमवारांना हे कळलं असतं, तर नागपुरात पोपट झाल्याची राजकीय चर्चा रंगली नसती.