AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : बड्या नेत्यांना मागे सारुन काँग्रेसकडून गीतकाराचे नाव निश्चित?

आंबेडकरी चळवळीतील मोठे गीतकार आणि संगीतकार अनिरुद्ध वनकर यांचे नावही निश्चित मानले जाते.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : बड्या नेत्यांना मागे सारुन काँग्रेसकडून गीतकाराचे नाव निश्चित?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 29, 2020 | 1:30 PM
Share

मुंबई : विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. काँग्रेसकडून गीतकार आणि संगीतकार अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. (Congress reportedly finalized Aniruddha Vankar for Governor elected Vidhan Parishad MLC)

मिरा भाईंदरमधील काँग्रेस नेते मुझ्झफर हुसैन, मुंबईतील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि माजी खासदार रजनी पाटील या तिघांच्या नावांना काँग्रेस हायकमांडने हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. आता अनिरुद्ध वनकर यांचे नावही निश्चित मानले जाते.

कोण आहेत अनिरुद्ध वनकर?

  • अनिरुद्ध वनकर यांचं विदर्भातील साहित्य क्षेत्रात मोठं नाव
  • आंबेडकरी चळवळीतील मोठे गीतकार आणि संगीतकार

रजनी पाटील यांना काँग्रेस राज्यसभेवर पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. रजनी पाटील या मराठवाड्यातील बीडच्या माजी लोकसभा खासदार आहेत. रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी याआधीही भूषवली आहे. सध्या त्या हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी आहेत.

राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठी काँग्रेसकडून चर्चेत कोण?

उर्मिला मातोंडकर सत्यजित तांबे सुरेश शेट्टी सचिन सावंत राजू वाघमारे नसीम खान मोहन जोशी बाबा सिद्दिकी रजनी पाटील

शिवसेना-राष्ट्रवादीकडून कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना

सुनील शिंदे – वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली

आदेश बांदेकर – शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर माहिममधून पराभव

सचिन अहिर – 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याची बक्षिसी म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता (Congress reportedly finalized Aniruddha Vankar for Governor elected Vidhan Parishad MLC)

शिवाजीराव आढळराव-पाटील – सलग तीन वेळा शिरुरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं

वरुण सरदेसाई – युवासेना सरचिटणीस

राहुल कनाल – युवासेना पदाधिकारी

वरुण सरदेसाई यांच्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे – भाजपचा राजीनामा देत नुकतेच राष्ट्रवादीत आगमन, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात

आदिती नलावडे – मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय

सूरज चव्हाण – राष्ट्रवादी पदाधिकारी

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते

आनंद शिंदे – प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जाते

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांसाठी निकष काय?

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

संबंधित बातम्या:

विधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत

Anand Shinde | राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

(Congress reportedly finalized Aniruddha Vankar for Governor elected Vidhan Parishad MLC)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...