राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : काँग्रेसच्या तिघा नेत्यांवर हायकमांडचे शिक्कामोर्तब, कोणाकोणाची वर्णी?

राज्यापालांकडे पाठवण्यासाठी विधानपरिषद आमदारांच्या यादीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.

  • सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 10:30 AM, 29 Oct 2020

मुंबई : विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. चारपैकी तीन नावांना काँग्रेस हायकमांडने हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावेळी राज्यापालांकडे पाठवण्यासाठी उमेदवारांच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. (Congress reportedly finalized the list for Governor elected Vidhan Parishad MLC candidature)

मिरा भाईंदरमधील काँग्रेस नेते मुझ्झफर हुसैन, मुंबईतील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची नावं अंतिम झाल्याची माहिती आहे. मराठवाड्यातून बीडच्या माजी लोकसभा खासदार रजनी पाटील यांचे नावही निश्चित मानले जाते. रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी याआधीही भूषवली असून सध्या त्या हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी आहेत. चौथे नाव अनुसूचित जाती-जमाती वर्गातून असण्याची शक्यता आहे.

राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठी काँग्रेसकडून चर्चेत कोण?

उर्मिला मातोंडकर
सत्यजित तांबे
सुरेश शेट्टी
सचिन सावंत
राजू वाघमारे
नसीम खान
मोहन जोशी
बाबा सिद्दिकी
रजनी पाटील

शिवसेना-राष्ट्रवादीकडून कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना

सुनील शिंदे – वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली

आदेश बांदेकर – शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर माहिममधून पराभव

सचिन अहिर – 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याची बक्षिसी म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता

शिवाजीराव आढळराव-पाटील – सलग तीन वेळा शिरुरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं

वरुण सरदेसाई – युवासेना सरचिटणीस

राहुल कनाल – युवासेना पदाधिकारी

वरुण सरदेसाई यांच्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते

(Congress reportedly finalized the list for Governor elected Vidhan Parishad MLC candidature)

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे – भाजपचा राजीनामा देत नुकतेच राष्ट्रवादीत आगमन, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात

आदिती नलावडे – मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय

सूरज चव्हाण – राष्ट्रवादी पदाधिकारी

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते

आनंद शिंदे – प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जाते

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांसाठी निकष काय?

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

संबंधित बातम्या:

विधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत

Anand Shinde | राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जवळपास निश्चित; राजू शेट्टींना दिलेलं वचनही पाळणार

(Congress reportedly finalized the list for Governor elected Vidhan Parishad MLC candidature)