5

Anand Shinde | राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद जागेच्या निवडणुकीतून ज्येष्ठ गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत आहेत.

Anand Shinde | राजकारणातही 'शिंदेशाही बाणा', गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 1:28 PM

मुंबई : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) राजकीय आखाड्यात उतरण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर आनंद शिंदे विधानपरिषद निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे विधीमंडळातही आता ‘खणखणीत’ शिंदेशाही आवाज घुमण्याची शक्यता आहे. (Renowned Singer Anand Shinde likely to get Maharashtra MLC Vidhan Parishad ticket from NCP)

आनंद शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे याआधीही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आनंद शिंदेंची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर लांबलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद निवडणुकीतून शिंदे राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

खरं तर, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतच आनंद शिंदे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. आनंद शिंदे यांना महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ किंवा माळशिरस या राखीव मतदारसंघातून आनंद शिंदे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु यथावकाश या चर्चा विरल्या.

आनंद शिंदे यांचा परिचय

आनंद शिंदे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे आहेत. त्यांच्या खणखणीत आवाजात अनेक गाणी गाजली आहेत. कोंबडी पळाली, शिट्टी वाजली, जवा नवीन पोपट हा.. यासारखी हिट गाणी आनंद शिंदे यांनी दिली आहेत. भारदस्त आवाजाचा गायक म्हणून ते ओळखले जातात. वडील प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आनंद शिंदे चालवत आहेत. मुलगा आदर्श आणि उत्कर्ष शिंदेही शिंदेशाहीची पताका डौलाने फडकवत आहेत.

दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि धनगर समाजाचे उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजते. (Renowned Singer Anand Shinde likely to get Maharashtra MLC Vidhan Parishad ticket from NCP)

राज्यपालनियुक्त सदस्यत्वासाठी निकष काय?

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या सोय पाहता अनेकदा हे निकष बाजूला ठेवले जातात. मात्र, कधी कधी राज्यपाल हे निकष पूर्ण करण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जवळपास निश्चित; राजू शेट्टींना दिलेलं वचनही पाळणार

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, माजी आमदाराचा दावा

(Renowned Singer Anand Shinde likely to get Maharashtra MLC Vidhan Parishad ticket from NCP)

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?