नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, माजी आमदाराचा दावा

"राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पॉझिटिव्ह चर्चा झाली, आठ दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार" असे एकनाथ खडसेंनी सांगितल्याचा दावा उदेसिंग पाडवींनी केला

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, माजी आमदाराचा दावा
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 12:39 PM

नंदुरबार : “मुंबईतून आनंदाची बातमी आणलीत का?” असा प्रश्न भाजप नेते एकनाथ खडसे यांना विचारला असता, त्यांनी शरद पवारांशी पॉझिटिव्ह चर्चा झाल्याचे सांगितले आणि नवरात्रीच्या पहिल्या माळेला आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार, असे खात्रीपूर्वक सांगितल्याचा दावा राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार आणि खडसे समर्थक उदेसिंग पाडवी यांनी केला आहे. पाडवी यांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या आदेशानेच झाला आहे, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. (Ex MLA Udesingh Padvi claims Eknath Khadse will join NCP on first Day of Navaratri)

“मागच्या सोमवारी मी मुक्ताईनगरला गेलो होतो. त्यावेळी नुकतेच साहेब (एकनाथ खडसे) मुंबईहून परत आले होते. मुंबईला काय घडलं, याबाबत माझ्या मनात उत्सुकता होती. देशाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसेंची चर्चा होणार होती, याची मला पूर्ण कल्पना होती. त्या उत्सुकतेपोटी मी जळगावला गेलो, माझ्यासोबत भाजपमध्ये असलेले माझे मित्र डॉ. स्वानंद आणि डॉ. आघाडे होते” अशी माहिती उदेसिंग पाडवी यांनी दिली.

“एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी मी गेलो असताना, त्यांना म्हटलं होतं, की आपणही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वार्ता जिल्ह्यात आहेत. पण मी कुठला निर्णय घ्यावा, याविषयी मार्गदर्शन करा. आपल्याला तर कुठेही मंत्रिपद, आमदारकी मिळू शकेल, पण माझ्या जिल्ह्यात (नंदुरबार) राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, की तुला जायचंच असेल, तर राष्ट्रवादीसारखा दुसरा पक्ष नाही. तुझं पुनर्वसन तिथेच होईल” असा दावा उदेसिंग पाडवी यांनी केला.

हेही वाचा : माझ्याच आदेशाने पडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश; खडसेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

“खडसेंच्या आदेशानेच मी 9 सप्टेंबरला मुंबईला गेलो. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने, जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला” असे पाडवींनी सांगितले. मी सोमवारी त्यांना भेटून “मुंबईतून आनंदाची बातमी आणली का?” असे विचारले. “पॉझिटिव्ह चर्चा झाली, उहापोह झाला. आठ दिवसात आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार” असे खडसेंनी सांगितल्याचा दावा पाडवींनी केला.

“राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कोटा आहे. त्यापैकी 4 ते 5 राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील. त्यामध्ये एक जागा एकनाथ खडसे यांची निश्चित आहे. त्यांना मानाचे पद पक्षात आणि मंत्रिमंडळात मिळणार आहे. तसे झाल्यासल उत्तर महाराष्ट्र आणि जिल्ह्याला चांगले दिवस येतील” असा विश्वासही पाडवींनी व्यक्त केला.

कोण आहेत उदेसिंग पाडवी?

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. गेल्या वर्षभरात पाडवी यांचा भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास झाला आहे. (Ex MLA Udesingh Padvi claims Eknath Khadse will join NCP on first Day of Navaratri)

उदेसिंग पाडवी हे 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शहाद्यातून उदयसिंग यांच्याऐवजी पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट दिलं.

उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उदेसिंग पाडवी यांनी पक्षांतर करत काँग्रेसचा झेंडा हाती धरला होता. त्यानंतर पाडवींना मतदारसंघही बदलून मिळाला. त्यामुळे शहादाऐवजी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना मतदारांनी कौल दिला नाही.

नंदुरबार मतदारसंघातून त्यांनी भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 87 हजार 373 मतदान झालं होतं. भाजपच्या विजयकुमार गावित यांना 94 हजार 442 मतं मिळाली होती, तर उदेसिंग पाडवी यांना 35 हजार 39 मते मिळाली होती. काँग्रेसमध्ये मात्र ते अल्पकाळ थांबले.

उदेसिंग पाडवी भाजपमध्ये असताना नंदुरबार जिल्ह्यात अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. उदेसिंग पाडवी आणि तत्कालीन खासदार यांच्यात अंतर्गत कुरबुरी अनेक वेळा उघड झाल्याने त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत असे.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर पाठवणार?

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा

एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

(Ex MLA Udesingh Padvi claims Eknath Khadse will join NCP on first Day of Navaratri)

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.