AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ, पोलीस महासंचालक चंदिगढ हॉलिडेवर, शिवसेनेची संजय पांडेंवर कारवाईची मागणी

संजय पांडे यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केल्याची माहिती आहे. (Sanjay Pandey Chandigarh Holiday Tauktae Cyclone )

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ, पोलीस महासंचालक चंदिगढ हॉलिडेवर, शिवसेनेची संजय पांडेंवर कारवाईची मागणी
उद्धव ठाकरे, आयपीएस अधिकारी संजय पांडे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 17, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय पांडे परवानगी न घेताच चंदिगढला सुट्टीवर गेल्याची माहिती आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज असून कारवाईची मागणी केली जात आहे. याआधीही संजय पांडे आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. (DGP Sanjay Pandey on Chandigarh Holiday as Maharashtra faces Tauktae Cyclone Shiv Sena CM Uddhav Thackeray upset)

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे विनापरवानगी चंदिगढला गेलेच कसे? असा सवाल विचारला जात आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज आहे. संजय पांडे यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केल्याची माहिती आहे.

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त

बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही, असंही त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी नाही

पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यावरही ताशेरे ओढले होते परमबीर सिंह यांचे काम व्यवस्थित नाही. त्यांनी आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याचेही संजय पांडे यांनी बोलून दाखवले होते. (DGP Sanjay Pandey on Chandigarh Holiday as Maharashtra faces Tauktae Cyclone Shiv Sena CM Uddhav Thackeray upset)

परमबीर सिंहांच्या चौकशीवरुनही पुन्हा पत्र

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली होती. ठाकरे सरकारने  पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती.

संबंधित बातम्या:

IPS पांडे म्हणतात, राज्य सरकारच्याविरोधात कोर्टात जाणार, साईड पोस्टिंगवर नाराज

VIDEO | पोलीस वसुली करतात का? हो, पण मग पैसा जातो कुठे? IPS संजय पांडेंनी आमीर खानला काय सांगितलं?

परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ, पोलीस महासंचालक संजय पांडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

(DGP Sanjay Pandey on Chandigarh Holiday as Maharashtra faces Tauktae Cyclone Shiv Sena CM Uddhav Thackeray upset)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...