AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ, पोलीस महासंचालक संजय पांडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती (Sanjay Pandey letter to Uddhav Thackeray)

परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ, पोलीस महासंचालक संजय पांडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उद्धव ठाकरे, आयपीएस अधिकारी संजय पांडे
| Updated on: May 21, 2021 | 12:18 PM
Share

मुंबई : पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली. ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (DGP Sanjay Pandey writes letter to CM Uddhav Thackeray sites unable enquiry of  Param Bir Singh)

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल.

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पाहा व्हिडीओ :

दोन वर्ष ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्यांना मोठी पदं दिली

माझ्याहून एक वर्ष आणि दोन वर्ष ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्यांना मोठी पदं दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही कार्यवाहक पोलीस महासंचालक बनवू शकत नाही. यूपीएससीला माझी फाईलच पाठवली नाही, हे सर्वच मी त्या पत्रात लिहिलं आहे. तसेच आता मी राज्य सरकारविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त

बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याआधी एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही, असंही त्यांनी याआधी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी नाही

पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यावरही ताशेरे ओढले होते परमबीर सिंह यांचे काम व्यवस्थित नाही. त्यांनी आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याचेही संजय पांडे यांनी बोलून दाखवले होते.

संबंधित बातम्या:

IPS पांडे म्हणतात, राज्य सरकारच्याविरोधात कोर्टात जाणार, साईड पोस्टिंगवर नाराज

VIDEO | पोलीस वसुली करतात का? हो, पण मग पैसा जातो कुठे? IPS संजय पांडेंनी आमीर खानला काय सांगितलं?

(DGP Sanjay Pandey writes letter to CM Uddhav Thackeray sites unable enquiry of  Param Bir Singh)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.