अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी जनतेने आम्हाला द्यावी, धनंजय मुंडेंचा पंकजांना अप्रत्यक्ष टोला

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्या पालकमंत्री होत्या, त्यांच्या काळात विकास कामे झालीच नाहीत, जी झाली ती अर्धवट आहेत. आता ही अर्धवट विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी जनतेने आम्हाला द्यावी, धनंजय मुंडेंचा पंकजांना अप्रत्यक्ष टोला
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 7:03 AM

बीड: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्या पालकमंत्री होत्या, त्यांच्या काळात विकास कामे झालीच नाहीत, जी झाली ती अर्धवट आहेत. आता ही अर्धवट विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आल्याची टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचे नाव न घेता केली आहे. ते  पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.

काय म्हणाले मुंडे ?

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पालकमंत्री असताना त्यांनी अनेक विकास कामे अर्धवट सोडली. आता ती विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्या विकास कामावर कळस चढवण्याची संधी जनतेने आम्हाला द्यावी. यावेळी बोलताना धंनजय मुंडे यांनी रेल्वेच्या रखडलेल्या कामाच्या मुद्द्यावरून देखील पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेक दिवस झाले रेल्वेचे काम रखडले होते. मात्र आता रेल्वेच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या काही दिवसांतच या मार्गावरून सुपर फास्ट ट्रेन धावेल असं त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात रेल्वे कधी येणार याची वाट पाहात अनेक पिढ्या गेल्या, मात्र आता तुमचे स्वन्प लवकरच साकार होणार असल्याचे यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही बहिण भाऊ आमने -सामने

दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा मुंडे बहिण भाऊ आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका केली होती. यांना ऊसतोड कामगारांचे काहीही देणेघेणे नाही, फक्त निवडणुका आल्यावरच त्यांना ऊसतोड कामगार आठवतात अशी टीका त्यांनी कोली होती.

संबंधित बातम्या

Video: आधी मोदी आणि आता अमित शाह, सुजय विखे पुन्हा पुन्हा फ्रेममध्ये का येतात? का हटवले जातात?

हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव, समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह, अधिवेशन गुंडाळावं लागणार?

Narendra Modi | भाजपला मोदींनी दिले 1000/- रुपये, देणगीची पावती शेअर करत मोदी म्हणाले…