Election 2022 : कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकांची तयारी जोमात, अंतिम प्रभागरचना 17 मेपर्यंत जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

| Updated on: May 10, 2022 | 7:59 PM

निवडणूक आयोगा आता एक्शन मोडममध्ये आला आहे. कारण निवडणूक आयोगाने आज अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचे आदेश हे राज्यातील बड्या महापालिकांना दिले आहेत. 17 मेपर्यंत अंतिम प्रभागरचना निश्चित करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने आज काढले आहेत.

Election 2022 : कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकांची तयारी जोमात, अंतिम प्रभागरचना 17 मेपर्यंत जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
आगामी निवडणुका होण्यात अडथळा?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा (Election 2022) असे आदेश अलिकडेच राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगा आता एक्शन मोडममध्ये आला आहे. कारण निवडणूक आयोगाने आज अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचे आदेश हे राज्यातील बड्या महापालिकांना (Municipal Corporation Election) दिले आहेत. 17 मेपर्यंत अंतिम प्रभागरचना निश्चित करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने आज काढले आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकाना पत्राद्वारे हे कळवण्यात आले आहे. सोमवारीच निवडणुक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. त्यामुळे आता या सर्व महापालिकांच्या निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे. आता या आदेशानंतर या महापालिकाही कामाला लागल्या आहेत.

कार्यक्रम पुढील प्रमाणे घ्यावे –

  1. 11 मेपर्यंत अंतिम प्रभाग रचना करण्याचे काम पूर्ण करावे असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
  2. 12 मेपर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावी.
  3. 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी असे आदेश निवडणूक आयोगाने वरील सर्व महापालिकांना दिले आहेत.

सर्वच राजकीय पक्ष जोमाने मैदानात

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली या सर्व राज्यातील बड्या महानगरपोलिका असल्याने सर्वच राजकीय पक्ष जोमाने आधीपासूनच निवडणुकांची तयारी करत आहेत. मुंबईतल्या लढतीकडे तर देशाचे लक्ष लागले असते. कारण सर्वांत जास्त महसूल देणारी महानगरपालिका म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं.

कुणाविरुद्ध कोण मैदानात?

  1. मुंबई महापालिकेत गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र यावेळी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.
  2. हे सुद्धा वाचा
  3. पुण्यात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे तिथे राष्ट्रवादी जास्त जोर लावत आहे. त्यासाठी अजित पावर गेल्या अनेक दिवसांपासून कामाला लागले आहेत.
  4. तर तिकडे नाशकात भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजपला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी संजय राऊत मैदानात उतरले आहेत.
  5. नागपुरातही भाजचीच सत्ता आहे. त्यामुळे यावेळी नागपुरातलं चित्र पाटलटण्यासाठी काँग्रेस जोर लावत आहे.

ओसीबी आरक्षणाशिवाय निवडणुका

या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारला दणका देत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र पाटलटलं आहे.