AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला चिंधी विचार म्हणतात साहेब, निलेश राणेंचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल

माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं.

याला चिंधी विचार म्हणतात साहेब, निलेश राणेंचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल
Nilesh Rane and Ajit Pawar
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 09, 2021 | 10:44 AM
Share

मुंबई : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. देशात मोगलाई आहे का या अजित पवारांच्या सवालावरुन निलेश राणेंनी निशाणा साधला. “अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं. इतकंच नाही तर “परवा भाषणात कुठेतरी मी अनेकवेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही असंही अजित पवार म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला. (Nilesh Rane attacks on Ajit Pawar)

निलेश राणे यांचं ट्विट

अजित पवार काय म्हणाले होते? 

अजित पवार काल अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का”, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.

जॅकेटवरुन हर्षवर्धन पाटलांना टोला

दोन दिवसापूर्वी अजित पवार इंदापुरात होते. अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या नुतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) उपस्थित होते. अजित पवारांनी यावेळी बोलताना भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा टोला हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता लगावला. तर इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही.काय चाललंय, असा सवाल अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.

(Nilesh Rane attacks on Ajit Pawar)

संबंधित बातम्या 

भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला     

आता देशात काय मोगलाई आली आहे का; अजित पवार मोदी सरकारवर संतापले

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ