भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांनी यावेळी टोला लगावला. Ajit Pawar Harashwardhan Patil

भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला
अजित पवार , उपमुख्यमंत्री

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमचं इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या नुतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) उपस्थित होते. अजित पवारांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकार, कोरोना, इंदापूर, जीएसटी यावर भाष्य केलं.  भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांनी यावेळी टोला लगावला. (Ajit Pawar criticize Harashwardhan Patil at Indapur)

भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?

अजित पवारांनी यावेळी बोलताना भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा टोला हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता लगावला. तर इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही.काय चाललंय, असा सवाल अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.

कोरोना कुणालाच सोडत नाही. ना दादाला ना मामाला. दादालाही कोरोनानं सोडलं नाही

कोरोनामुळे अनेकांना कार्यक्रम घेता आले नाहीत. कोरोनामुळे मोठं नुकसान झालं असून अनेकांना गमवावं लागलं आहे. पूर्वी विभागीय कार्यालय कमी जागेत असल्यामुळे अडचण व्हायची.त्यामूळे इंदापूर शहराला शोभेल अशी इमारत उभारली.आता ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यानंतर इतरही निवडणुका घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला आहे. अजित पवार यांनी यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या 33 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला. राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी आपली कामे सुरूच राहिली पाहिजेत, असं ते म्हणाले. जनतेच्या प्रश्नांची बांधिलकी लक्षात घेवून राष्ट्रवादी काँग्रेस काम करतं.आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. आता कोरोना कमी होत असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाला. काळजी घ्या इथं कुणीच मास्क लावलेला दिसेना. कोरोना कुणालाच सोडत नाही. ना दादाला ना मामाला. दादालाही कोरोनानं सोडलं नाही, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

25 हजार कोटी जीएसटीचं येणं

सामान्य व्यक्तीला मदत व्हावी या हेतूने जिल्हा बँक चालवत आहोत. अनेकजण नोकरीसाठी येतात पण गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल. साडेतीन लाख कोटी रुपयांमध्ये राज्य चालवायचं आहे. दिड लाख कोटी रुपये पगारासाठी जातात उर्वरीत दोन लाख कोटी रुपयात सर्व विभागांना निधी द्यावा लागतो.

केंद्रात सरकार नसलं तरी सुप्रिया सुळे पाठपुरावा करत असतात. यावर्षी एक लाख कोटी रुपये कमी येतील. 25 हजार कोटी जीएसटीचं येणं. पुणे जिल्ह्यात 10 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. आप्पा थोडक्या मतांनी गेले.. नाहीतर आज दौंडलाही असाच निधी मिळाला असता. यशवंत माने तर इंदापूरहून मोहोळला गेले आणि तिकडे आमदार झाले.

तुमच्या दत्तात्रय भरणे यांना मंत्री केलं.

अजित पावर यांनी तुमच्या दत्तात्रय भरणेंना मंत्री केल्याचं सांगितले. सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे. रस्त्याची सगळी कामे पठ्ठ्याकडेच, अशोकराव चव्हाणही त्यांना मदत करतात. सामान्य प्रशासन विभाग जे खातं मुख्यमंत्री ठेवतात त्याचं राज्यमंत्रीपद दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिलं आहे. मामा मंत्री म्हणून नवखा आहे.पण, पाठपुरावा करायला चिकट आहे, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘ती’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही : अजित पवार

अजित पवारांकडून भरणेमामांचं सांत्वन, विठोबा भरणे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Ajit Pawar criticize Harashwardhan Patil at Indapur

Published On - 2:05 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI