AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता देशात काय मोगलाई आली आहे का; अजित पवार मोदी सरकारवर संतापले

शेतकऱ्यांना मिळणारे दीड लाख रुपयांचे तसेच कंटेनरच्या भाड्याचे दोन लाख रुपयांचे अनुदान बंद केले. एकूणच केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे. | Ajit Pawar

आता देशात काय मोगलाई आली आहे का; अजित पवार मोदी सरकारवर संतापले
| Updated on: Feb 08, 2021 | 4:57 PM
Share

अमरावती: देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. (Ajit Pawar slams Modi govt over farmers issue)

ते सोमवारी अमरावीत येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर ताशेरे ओढले. केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीचे अनुदान बंद केले. शेतकऱ्यांना मिळणारे दीड लाख रुपयांचे तसेच कंटेनरच्या भाड्याचे दोन लाख रुपयांचे अनुदान बंद केले. एकूणच केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे, हे कळायला मार्ग नाही. पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

अदानी उद्योसमूहाचे मालक शरद पवार यांच्या घरी जाऊन आल्यानंतर राज्य सरकारने वीजबिल माफीचा प्रस्ताव गुंडाळला, या राज ठाकरे यांच्या आरोपालाही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. या गोष्टीत थोडंही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात की, त्यामधून बातम्या तयार होतात. शरद पवार 60 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. ते असं करुच शकत नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला होता.

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून थेट उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या वाडी परिसरात ही घटना घडली. वाढीव वीजबिलासंदर्भात निवेदन देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते अजित पवारांच्या गाडीसमोर गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी कोंडाळे करुन अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाड्यांचा ताफा वेगात असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वीजबिल माफीविषयी केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरले होते. जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही. मात्र आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांना वीज पंपांकरता सवलत दिली आहे. त्यामध्ये हजारो कोटी रुपये महावितरण कंपनी सहन करणार आहे. शेवटी हे चालवण्याकरता निधी लागतो. तरी देखील काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरता माफ केले आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.

(Ajit Pawar slams Modi govt over farmers issue)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.