अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (14 एप्रिल) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे सभा घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे बॅनर दाखवल्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही काळ गोंधळ उडाला. शेतकऱ्यांना पोलिसांकडून अटक पोलिसांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त […]

अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले!
Follow us on

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (14 एप्रिल) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे सभा घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे बॅनर दाखवल्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही काळ गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांना पोलिसांकडून अटक

पोलिसांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांच्यासह पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अटक केली आहे. या शेतकऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना केला आहे. तोपर्यंत या कार्यकर्त्यांना सोडत नाही तोपर्यंत ठाण्यात हटणार नाही अशी भूमिका या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलीआहे यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सरकार प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागे उभे आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहे, त्या रास्त आहेत. लवकरच त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसचे, ज्या शेतकऱ्यांना अटक केली, त्यांना सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

“आम्ही आमच्या मागण्या मागण्यासाठी काळे झेंडे दाखवले. मात्र आमच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि काहींना मारहाण सुद्धा केली. मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात  सांगितले होते की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे लक्ष देऊ नका, ग्रामीण भागात का जनावर राहतात का? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना जागा दाखवू.” असा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी इशारा दिला.

‘या’ सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले?

“विकासाच्या मुद्द्यावर गप्पा मारणारे आमचे सरकार नाही. विकास करुन दाखवतो आणि मग बोलतो. आम्ही चार वर्षांतच अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी चौपट निधी दिला आहे. आधीच्या सरकारने विकास केला नाही.” असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.