Ganesh Naik : गणेश नाईक यांना कोर्टाकडून “तारीख पे तारीख”, जामिनावर फैसला 30 एप्रिलला

| Updated on: Apr 28, 2022 | 5:51 PM

गणेश नाईक यांच्या जामीनावर आजही निर्णय झाला नाही. ठाणे न्यायालयाने गणेश नाईक प्रकरणी 30 एप्रिल 2022 रोजी निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे. हा निर्णय दुपारी 3 वाजता होणार आहे, असेही स्प्ष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाणे कोर्टाने वेळेचे कारण देत तारीख पुढे ढकलली आहे.

Ganesh Naik : गणेश नाईक यांना कोर्टाकडून तारीख पे तारीख, जामिनावर फैसला 30 एप्रिलला
Ganesh Naik : गणेश नाईक यांना कोर्टाकडून "तारीख पे तारीख",
Image Credit source: tv9
Follow us on

ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना ठाणे कोर्ट तारीख पे तारीख देताना दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून नाईकांवर झालेल्या आरोपांवर युक्तीवाद सुरू आहे. नेरूळ पोलीस नाईकांची पोलीस (Navi Mumbai Police) कस्टडी मागत आहेत तर नाईकांचे वकील आरोप फेटाळून लावत आहे. मात्र गणेश नाईक यांच्या जामीनावर आजही निर्णय झाला नाही. ठाणे न्यायालयाने गणेश नाईक प्रकरणी 30 एप्रिल 2022 रोजी निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे. हा निर्णय दुपारी 3 वाजता होणार आहे, असेही स्प्ष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाणे कोर्टाने वेळेचे कारण देत तारीख पुढे ढकलली आहे. दीपा चव्हाण (Deepa Chauhan) या महिलेने गणेश नाईक यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणात महिला आयोगानेही लक्ष घेतले आहे. तर गणेश नाईक यांचा राजकीय फायदा उचलण्यासाठी हे आरोप होत असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे.

नाईकांना जामीन देऊ नका-दीपा चव्हाण

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. गणेश गेल्या अनेक दिवसांपासून याच प्रकरणात नॉट रिचेबल आहेत. या महिलेकडून गणेश नाईक यांना जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. गणेश नाईक यांना जामीन दिल्यास माझ्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती या महिलेने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता न्यायालय यात काय निर्णय घेतं हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तसेच गेली अनेक वर्षे गणेश नाईक हे आपल्याला धमकावून बळजबरीने संबंध प्रस्थापित करत असल्याचाही आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे.

नाईकांच्या वकीलाने आरोप फेटाळून लावले

गेल्या अनेक वर्षांपासून सहमतीने हे प्रेमसंबंध होते, त्यामुळे यात अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ही महिला ज्या प्रकारे आरोप करत आहे. त्याबाबत गणेश नाईक हे आली डीएनए चााचणी करण्यास तयार असल्याचेही त्यांच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे यावरून राजकीय आरोपही होताना दिसत आहे. या प्रकरणात महिला आयोगाने लक्ष घातले असून पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यात आता नाईकांना बेल मिळतो की जेल हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.