Ganesh Naik : गणेश नाईक DNA चाचणीलाही तयार, वकीलांचा कोर्टात वादळी युक्तीवाद, आज जामीनावर निर्णय

नाईक यांची कस्टडी हवी आहे अशी विनंती नेरुळ पोलिस (Navi Mumbai Police) ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी ठाणे सत्र न्यायालयात केली. तर फिर्यादीच्या आरोपांना उत्तर देताना गणेश नाईक हे डीएनए (DNA Test) चाचणीसाठी तयार असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकीलाने केला आहे.

Ganesh Naik : गणेश नाईक DNA चाचणीलाही तयार, वकीलांचा कोर्टात वादळी युक्तीवाद, आज जामीनावर निर्णय
गणेश नाईक यांना आज दिलासा नाहीचImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 10:06 AM

नवी मुंबई : गणेश नाईक यांनी जामीन मिळणार की नाही, हे आज स्पष्ट होणार आहे. भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या विरुद्ध महिलेने नवी मुंबईत दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांत अंतरिम जामिनावर बुधवारी (26 एप्रिल) झालेल्या सुनावणीवर ठाणे सत्र न्यायालयात आज (28 एप्रिल) निर्णय होणार आहे. गणेश नाईक यांना आज अंतरिम जामीन मिळतो का किंवा गणेश नाईक यांना कोठडीत जावं लागत यावर सर्वांचं लक्ष लागलं असतांना ठाणे सत्र न्यायालयात गणेश नाईक आणि फिर्यादी या दोघांच्या वकिलांमध्ये मात्र आज फक्त युक्तिवाद झाला. या युक्तिवादात गणेश नाईक आणि फिर्यादी च्या वकिलांनी आपली बाजु मांडली तर सर्वात महत्त्वाच म्हणजे गणेश नाईक यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणात आम्हाला गणेश नाईक यांची आम्हाला वैद्यकीय चाचणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला नाईक यांची कस्टडी हवी आहे अशी विनंती नेरुळ पोलिस (Navi Mumbai Police) ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी ठाणे सत्र न्यायालयात केली. तर फिर्यादीच्या आरोपांना उत्तर देताना गणेश नाईक हे डीएनए (DNA Test) चाचणीसाठी तयार असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकीलाने केला आहे.

नाईकांनी धमकावल्याचा आरोप

तर बेलापूर पोलीस ठाण्यात धमकवने आणि रिव्हॉल्व्हर दाखवल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात आम्हाला हत्यार जप्त करुन पुढील तपास करण्यासाठी गणेश नाईक यांना कस्टडी हवी आहे. त्यामुळे नाईक यांना जामीन देऊ नये अशी विनंती बेलापूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात केली. दरम्यान गणेश नाईक यांच्या वकिलांनी त्यांची बाजु मांडत नाईक आणि फिर्यादी यांच्यात जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं त्यामुळे हा बलात्कार होऊ शकत नाही, असं म्हणणं न्यायालयात मांडलं तसेच गणेश नाईक यांनी गुन्ह्यात वापरलेली परवानाधारक रिव्हॉल्व्हर आम्ही पोलीस तपासाला देण्यास तयार आहोत आणि ज्या प्रकारे फिर्यादी ने आरोप केले आहेत त्यासाठी नाईक हे DNA तपासणीसाठी देखील तयार असल्याची महत्त्वाची माहिती नाईक यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडली.

उद्या नाईकांना दिलासा की दणका?

तर फिर्यादी यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात 2010 ते 2017 या काळात गणेश नाईक यांनी फिर्यादीच्या मनाविरुद्ध आणि धमकावुन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे हा बलात्कार आहे. तसेच फिर्यादीवर गुन्हे मागे घेण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना वारंवार दबाव टाकुन धमकवल जात आहे. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मुलाच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे नाईक यांना जामीन मिळु नये विनंती फिर्यादी यांच्या वकिलांनी न्यायाधीश एन के ब्रम्हे यांच्याकडे केली. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून निर्णय हा राखून ठेवला आहे. अंतिम निर्णयावर आता आज सुनवाई होणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.