AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा संपला? संजय राऊत म्हणाले, आता तो विषय…

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिल्यानंतर मविआने पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विलीनीकरण म्हणजे "दंतकथा" असल्याचे सांगत मविआच्या एकजुटीवर आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेवर भर दिला.

Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा संपला? संजय राऊत म्हणाले, आता तो विषय...
संजय राऊत
| Updated on: Mar 05, 2026 | 10:53 AM
Share

सध्या महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक  चर्चेत असून येत्या 16 मार्चला महाराष्ट्रातील 7 जागांसाठी तर 10 राज्यांतील 30 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गणित जुळवणं, संख्याबळ यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत होत्या. अखेर आता महायुतीमध्ये भाजपने 4 तर मविआतर्फेही नाव जाहीर करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानाता उतरणार आहेत. विलीनीकरणाचा प्रश्न आता उद्भवत नाही हे जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर मविआधील काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका मांडली.

शरद पवारांना पाठवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असला तरी एनसीपीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. दोन्ही एनसीपीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा, तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल. अशी एक अट त्यावेळी ठेवण्यात आल्याचं कळतंय, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला होता. जयंत पाटील यांनी ही घोषणा केल्यावरच काल शरद पवार यांना पाठिंबा घोषित करण्यात आला, याबद्दल राऊतांकडे विचारणा करण्यात आली.

काय म्हणाले राऊत ?

काल जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाबाबत भूमिका स्पष्ट केली. मुळात माझं असं पहिल्यापासून (अजित दादा असल्यापासून) मत होतं की, हे विलीनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. काही निष्पन्न होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नव्हती. पण काही लोकांना वाटत असेल, पण ही दंतकथा होती. ती दंतकथा आता संपलेली आहे. आम्हाला सर्वांना मविआ म्हणून एकत्र काम करावे लागेल. याची आमची मानसिक तयारी आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.

सत्ता येते, सत्ता जाते. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात, भाजपची सर्व सरकार अपयशी ठरली आहेत, प्रश्नांचा डोंगर आहे समोर, अशा वेळेस जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागणार आहे. जे विरोधी पक्षात आहेत, त्यांनी उगाच सत्तेच्या मागे (आत्ता) धावू नये. आगामी, पुढल्या निवडणुकांची तयारी करावी, असं आमचं मत आहे, असा सूचक इशारा राऊतांनी दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...