AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत आहे. सलग अकराव्या दिवशीही अमेरिकेने मोठे हल्ले इराणवर केले. ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडाला. इराणकडून मोठा इशारा देण्यात आला.

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..
America attack on Iran
| Updated on: Jul 22, 2026 | 10:03 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका मोठे हल्ले इराणवर करत आहे. तणाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाला होता. त्यानंतर पुन्हा युद्ध पेटले आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला अकराव्या दिवशीही सलग केला. इराणच्या पाच शहरांवर अमेरिकेने हल्ला केला. आपल्या अणुसुविधांना लक्ष्य न करण्याचा इशारा तेहरानने अमेरिकेला दिला होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, हे हल्ले होर्मुजच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांना धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता कमकुवत करणे सुरू ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. इराणकडूनही होर्मुज खाडीच्या आसपास आणि शहरांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. अमेरिका आपले हल्ले थांबवण्याचे नाव घेत नाही.

रात्रभर अमेरिकेने इराणवर हल्ले केले. आता या हल्ल्यानंतर इराण नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाला त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. भारतात एलपीजी गॅस आणि कच्चे तेल होर्मुज खाडीतून दाखल होते. याचा फटका भारताला बसेल.

इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी तेहरानमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ब्रिज, चाबहार, कोनारक आणि इराणचा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेरमध्येही स्फोट झाल्याची माहिती आहे. जोपर्यंत अमेरिका इराणवर हल्ले करत राहिल. तोपर्यंत इराणकडून होर्मुज खाडी बंदल ठेवली जाईल. ज्याचा थेट फटका जगातील इतर देशांना होईल.

तीन महिन्यांच्या आसपास चाललेल्या या युद्धात भारतात कच्च्या तेलाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. यासोबतच केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. जर अजून काही दिवस अमेरिकेचे हल्ले सुरूच राहिले तर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलची समस्या निर्माण होऊ शकते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसत आहेत. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारांदरम्यान, बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या दरात 2.01 टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति बॅरल 91.01 डॉलरवर पोहोचले.

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप