AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लड शुगर आणि पोटॅशियमची कमी? सोनम वांगचुक यांची कशी आहे तब्येत?

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राम येथील मेंदाता रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून येथे हलवण्यात आले होते. दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, कारण ते सध्या डॉ. सुशीला कटारिया यांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

ब्लड शुगर आणि पोटॅशियमची कमी? सोनम वांगचुक यांची कशी आहे तब्येत?
sonam wangchuk Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 10:23 AM
Share

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची मंगळवारी हेल्थ अपडेट देण्यात आली होती. या अपडेट नुसार वांगचुक यांची प्रकृती अजून स्थिर आहे. पण दीर्घ काळ उपवास केल्याने त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम झालेला दिसत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत नजर ठेवून आहेत. मात्र, वांगचुक यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वांगचुक यांच्या शरीरात ब्लड शुगर आणि पोटॅशियमची कमी आहे. त्यांची सिरम पोटॅशियम 3.2 मिलीमोल प्रति लिटर आहे. सामान्यपणे हे प्रमाण 3.5 ते 5.0 मिलीमोल प्रति लिटर असायला हवं. शरीरातील पोटॅशियमच्या कमीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टर विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतचं हेल्थ बुलेटीन आज थोड्या वेळाने जारी होण्याची शक्यता आहे. त्यात वांगचुक यांच्या प्रकृतीचा अपडेट रिपोर्ट येणार आहे.

दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार, जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वांगचुक यांना काल संध्याकाळी साडे सात वाजता मोठ्या बंदोबस्तात मेंदाता रुग्णालयात आणण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांगचुक यांना आंतरिक चिकित्सा विशेषज्ञ डॉ. सुशीला कटारिया यांच्या निगराणीखाली आयसीयू-आठमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर भरती

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली होती. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने हे आदेश दिले होते. सुनवाणी वेळी कोर्टाने मेदांता रुग्णालायत वांगचुक यांना दाखल करण्यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. पण डॉक्टरांनी वांगचुक हे डॉक्टरांच्या देखरेखी खाली सातत्याने राहिले पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयातून संध्याकाळी सुट्टी देण्यात आली आणि मेंदातामध्ये आणण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व मेडिकल रिपोर्टही जोडण्यात आले होते.

मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मंगळवारी देशभरात आंदोलनं करण्यात आले. दिल्लीसह महाराष्ट्र, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, हरियाणा, झारखंड यांसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस नेते आणि युवकांनी आंदोलनं केली. मंगळवारी राहुल गांधी हे वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा, दोन मुख्यमंत्री आणि पक्षाच्या इतर नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. सोमवारी झालेल्या सीजेपीच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही सहभाग घेतला होता.

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...