AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा भाचा शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन

समीर देसाई यांनी काँग्रेसमधून त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. (Gurudas Kamat Newphew Sameer Desai Shivsena)

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा भाचा शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन
समीर देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 27, 2021 | 2:07 PM
Share

मुंबई : मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर देसाईंनी शिवबंधन हाती बांधले. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत. बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. (Gurudas Kamat Newphew BJP Leader Sameer Desai joins Shivsena)

काँग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवक

समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवलं आहे. सलग दहा वर्ष समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते.

भाजपमधील गटबाजीला कंटाळून शिवसेना प्रवेश

काँग्रेसमधून त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देसाईंचा भाजपप्रवेश झाला होता. प्रवेशानंतर लगेचच त्यांना भाजपचं सचिवपद देण्यात आलं होतं. मात्र आता भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.

Gurudas Kamat Newphew Sameer Desai Shivsena

उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजपचे माजी सचिव समीर देसाई आणि सुपुत्र रौनक यांना शिवबंधन

बीएमसी निवडणुकांपूर्वी शिवसेनेत इनकमिंग

मुंबई महापालिका निवडणुकीला एक वर्षाचा अवधी उरला असताना शिवसेनेत आता इनकमिंग सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

गुरुदास कामत कोण होते?

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे ऑगस्ट 2018 मध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली होती.

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुदास कामत यांनी निधनाच्या वर्षभर आधी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या गुरुदास कामतांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली होती. (Gurudas Kamat Newphew BJP Leader Sameer Desai joins Shivsena)

गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास

1972 साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश 1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व 2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार 2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव

संबंधित बातम्या :

मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर आता प्रदेश काँग्रेस?; काँग्रेसमध्ये चाललंय काय?

Special Story | काँग्रेसमधील गटबाजी संपली का?; वस्तुस्थिती काय?

(Gurudas Kamat Newphew BJP Leader Sameer Desai joins Shivsena)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.