Special Story | काँग्रेसमधील गटबाजी संपली का?; वस्तुस्थिती काय?

मुंबई काँग्रेसमधील गटबाजी खरोखच संपुष्टात आलीय का? हा प्रश्न आहे. त्याविषयाचा घेतलेला हा आढावा

Special Story | काँग्रेसमधील गटबाजी संपली का?; वस्तुस्थिती काय?
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 7:03 AM

मुंबई : मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारून अवघा महिना होत नाहीत तोच भाई जगताप यांनी (Factionalism In Congress Party ) काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसमध्ये आता सर्व काही अलबेल असल्याचं त्यांना सांगायचं आहे. परंतु, मुंबई काँग्रेसमधील गटबाजी खरोखच संपुष्टात आलीय का? हा प्रश्न आहे. त्याविषयाचा घेतलेला हा आढावा (Factionalism In Congress Party ).

भाई जगताप नेमंक काय म्हणाले?

चार दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिम येथील उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाई जगताप यांनी काँग्रेसमध्ये आता कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. सर्व नेते एकजुटीने काम करत असल्याची घोषणा केली होती.

या चिमण्यांनो परत फिरा रे…

या मेळाव्यात त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा घर वापसी करण्याचं आवाहन केलं. काँग्रेसमध्ये सर्व जुन्या नेत्यांचं स्वागत आहे. पक्ष सोडून गेलेल्यांसाठी पक्षाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असं भाई जगताप म्हणाले.

गटबाजी नाही… भाई का म्हणाले?

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भाई जगताप हे गेल्या महिन्याभरापासून सत्कार समारंभ आणि मेळाव्यात रममाण आहेत. त्यांनी अजूनही मुंबईतील बड्या नेत्यांची बैठक बोलवून त्यांच्याशी संवाद साधला नाही. मिलिंद देवरा, संजय निरुपम, अमरजीतसिंग मनहास, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, जनार्दन चांदूरकर, चंद्रकांत हंडोरे आदी नेत्यांना बोलावून जगताप यांनी एकदाही त्यांच्याशी संवाद साधलेला नाही. तरीही त्यांनी काँग्रेसमधील गटबाजी संपल्याचं जाहीर केलं. त्याला कारणही तसंच आहे. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी आणि त्यानंतरपासून अडगळीत गेलेले काँग्रेस नेते संजय निरुपम काँग्रेसच्या सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाले. निरुपम यांच्या उपस्थितीमुळे जगताप यांना स्फुरण चढलं. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये गटबाजी संपल्याचं जाहीर केलं असावं, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

काँग्रेसमध्ये गट किती?

मुंबई काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. प्रत्येकाचा स्वतंत्र कारभार आणि प्रत्येकाची वेगळी लॉबिंग चालते. मिलिंद देवरा, प्रिया दत्त, अमरजितसिंह मनहास, जनार्दन चांदूरकर, एकनाथ गायकवाड आणि संजय निरुपम हे सर्वजण स्वयंभू नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या नेत्यांमध्ये नेहमीच मुंबईवरील वर्चस्वासाठीची लढाई पाहायला मिळते. आता जरी भाई जगताप काँग्रेसमध्ये गटबाजी नसल्याचं सांगत असले तरी पालिका निवडणुकीच्यावेळी तिकीट देताना ही गटबाजी प्रकर्षाने उफाळून आलेली दिसेल, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

गटबाजी संपूच शकत नाही

कुणी कितीही दावे केले तरी काँग्रेसमधील गटबाजी कधीच संपू शकत नाही. स्वातंत्र्यापूर्वीपासूनच काँग्रेसमध्ये गटबाजीची परंपरा आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी असण्या मागचं कारणही तसंच आहे. काँग्रेस हा अत्यंत लिबरल पक्ष आहे. या पक्षात आपलं मत मांडण्याचा आणि गट स्थापन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. उलट जो जास्त शक्तिप्रदर्शन करेल त्याला पक्षात जास्त मान असतो. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी संपेल असं वाटत नाही, असं ‘नवभारत टाईम्स’चे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं. पूर्वी काँग्रेसमध्ये मुरली देवरा आणि गुरुदास कामत हे दोनच गट होते. आता हे दोन्ही मातब्बर नेते राहिले नाहीत. मिलिंद देवरांची तेवढी ताकद राहिली नाही. कामत गटाच्या अमरजित सिंग मनहास यांना मुंबईचं अध्यक्षपद मिळालं नाही, यावरून त्यांची किती ताकद राहिली हे दिसून येतं. देवरा-मनहास यांची ताकद कमी झाली असली तरी त्याचा अर्थ गटबाजी संपली असा होत नाही, असं शितोळे यांनी स्पष्ट केलं (Factionalism In Congress Party).

राहुल गांधींचा नवा फॉर्म्युला

भाजप दिवसे न् दिवस अधिकच मजबूत होत चालला आहे. आता भाजपला रोखणं तसं शक्य दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षातील गटबाजी मोडित काढून संघटनेला नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी नवा फॉर्म्युला समोर आणला आहे. नाराजांना अध्यक्षपद नाही मिळालं तर विविध समित्यांवर त्यांना सामावून घेण्याचा हा फॉर्म्युला आहे. जगताप यांची अध्यक्षपदी नियुक्त करताना हाच फॉर्म्युला वापरला गेला. जगताप यांना मुंबई प्रदेशचं अध्यक्षपद दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या रेसमधील चंद्रकांत हंडोरेंना मुंबई काँग्रेस प्रभारीपद देण्यात आलं आणि पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यात आली. प्रत्येक नेत्याला पक्षात अॅडजस्ट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. गटात राहून राजकारण केलं तर आपला उद्धार होणार नाही, हा वरपासून ते खालपर्यंत मेसेज देण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे. त्याला काँग्रेस नेते कितपत प्रतिसाद देतात हे आगामी काळात दिसेलच, असं शितोळे यांनी सांगितलं.

म्हणून स्वबळाची तयारी

भाई जगताप यांना पक्षात गटबाजी नको आहे. आपण उत्तम पद्धतीने संघटन चालवतो हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई पालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. आघाडीत एकत्र निवडणुका लढलो तर कमी जागा वाट्याला येतील. त्यामुळे कार्यकर्त्यांना तिकीट देताना मारामार होईल. त्यानिमित्ताने पक्षातील गटबाजी उफाळून येईल. हे सर्व टाळण्यासाठी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. स्वबळावर निवडणुका लढल्यास अधिकाधिक कार्यकर्त्यांना तिकिट मिळेल. त्यामुळे कार्यकर्ताही पक्षात टिकून राहील. शेवटी पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, हे जगताप चांगलं जाणून आहेत. त्यामुळेच आतापासून ते गटबाजी होणार नाही, यासाठी पावलं टाकत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Factionalism In Congress Party

संबंधित बातम्या :

शेतकरी आंदोलन ते अर्थव्यवस्था, CWC बैठकीत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

सुशीलकुमार शिंदे, मीराकुमारही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; मेमध्ये होणार निवडणूक?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.