राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. (sonia Gandhi Targets Arnab Goswami On Alleged Whatsapp Chat)

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 2:43 PM

नवी दिल्ली: पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (sonia Gandhi Targets Arnab Goswami On Alleged Whatsapp Chat)

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. गेल्या काही दिवसात आपण धक्कादायक बातम्या वाचल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळल्या जातयं हे आपण पाहिलं आहे. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया गांधी यांनी चढवला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारला खासगीकरण करण्याची प्रचंड घाई झालेली दिसतेय, असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला आहे.

अहंकारी सरकार

यावेळी शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मोदी सरकारने अहंकार आणि संवेदनाहिनतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारने कृषी कायदे घाईघाईत मंजूर केले. हे कायदे समजून घेण्यासाठी विरोधकांना संधीच दिली नाही आणि आता शेतकऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. काँग्रेसने सुरुवातीलाच हे तिन्ही कायदे फेटाळून लावले होते. या कायद्यातून एमएसपीपासून ते अन्न सुरक्षेपर्यंतचे प्रश्न उपस्थित होत आहेत, असंही त्या म्हणाल्या. (sonia Gandhi Targets Arnab Goswami On Alleged Whatsapp Chat)

मेमध्ये निवडणुका

दरम्यान, या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीत केसी वेणूगोपाल यांनी सेंट्रल इलेक्शन ऑथेरिटीने शेड्यूल वाचलं. त्यानुसार मेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. नव्या अध्यक्षाला या पाच राज्यातील निवडणुकांची तयारी करण्याचा वेळ मिळणार नाही, त्यामुळेच तूर्तास पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षा पाच राज्यांच्या निवडणुकांवर फोकस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. (sonia Gandhi Targets Arnab Goswami On Alleged Whatsapp Chat)

संबंधित बातम्या:

सुशीलकुमार शिंदे, मीराकुमारही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; मेमध्ये होणार निवडणूक?

तुम्ही काँग्रेसच्या कॅलेंडर वुमन पाहिल्यात?; राहूल नाही, प्रियांका गांधी घराघरात!

राहुल गांधींना पर्याय कोण?; अशोक गेहलोत होणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष?

(sonia Gandhi Targets Arnab Goswami On Alleged Whatsapp Chat)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.