
29 महापालिकांसह सर्वांच लक्ष लागलेली मुंबई महापालिकेची अर्थात बीएमसी निवडणूकही अवघ्या 3 दिवसांवर आली आहे. 15 जानेवारील राज्यभरात मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 16 ला मतमोजणी व निकाल लागेल. त्याआधी विविध राजकीय समीकरणे आखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे एक महत्वाचं विधान केलं असून त्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. मजबूत महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत सामील होण्यासही तयार आहे, असं राज ठाकरे(Raj Thackrey) म्हणाले. राजकीय दृष्टिकोनात लवचिकता म्हणजे वैचारिक तडजोड नाही असंही त्यांनू नमूद केलं.
शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये MNS प्रमुख राज ठाकरे हे अनेक विषयांवर बोलले. ते व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले असून आगामी महापालिक निवडणुकीत त्यांची युती आहे. याबद्दलही ते स्पष्टपणे बोलले. मराठी लोकांचं कल्याण, मराठी भाषेचे जतन आणि विकास आणि एक मजबूत महाराष्ट्र हेच आपल्यासाठी सर्वात महत्वाचं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. जर पाणी एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचवायचे असेल तर कोणतीही पद्धत वापरली जाऊ शकते, तुमचा उद्देश “स्वच्छ आणि शुद्ध” असणं महत्वाचं, असं मनसेप्रमुखांनी सांगितलं.
आर्थिक मदतीशिवाय कोणतीही भाषा टिकू शकत नाही : राज ठाकरे
मराठीला अभिजात भाषा घोषित करण्यामागील केंद्र सरकारच्या हेतूवर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ते म्हणाले की ते भाषेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी काहीही होताना दिसत नाही. “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही एक रुपयाही मराठीसाठी देण्यात आलेला नाही, तर संस्कृतवर खूप निधी खर्च केला जात आहे, असं ते म्हणाले. सतत आर्थिक मदतीशिवाय कोणतीही भाषा टिकू शकत नाही किंवा वाढू शकत नाही असा युक्तिवादही त्यांनी केला.
ट्रम्प यांची साथ देण्यासही तयार
20 वर्षांनी एकत्र आलेले राज व उद्धव ठाकरे हे आता एकत्र निवडणूक लढवत आहेत. ही एकता केवळ मराठीवर केंद्रित आहे, त्याहून अधिक काही नाही, असं राज ठाकरे म्हणाले. याच आता राज्य किंवा केंद्रीय पातळीवर युतीमध्ये रूपांतर होईल असा विचार कोणीही करत तर ते चुकीचे ठरेल, कारण निवडणुकीतील युती हा “पूर्णपणे वेगळा मुद्दा” आहे.
यामुळे जर महाराष्ट्र मजबूत होण्यास मदत मिळत असेल तर ट्रम्पसारख्या व्यक्तीला पाठिंबा देण्यासही मी कचरणार नाही. ले. राज्याच्या हितापेक्षा राजकीय पदं महत्वाची नाहीत, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
मराठीच्या मुद्यावर माघार नाहीच
निवडणुकीत पराभव झाला तरी मराठी अस्मितेवर ठाम भूमिका घेत राहू. ही राजकीय भूमिका नाही, तर काका आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, वडील आणि आजोबा यांच्याकडून मिळालेल्या मूल्यांवर आधारित खोल धारण केलेली श्रद्धा आहे असं राज ठाकरे म्हणाले. मी “पूर्णपणे मराठी” असे म्हणत या मुद्यावर कधीही माघार घेणार नाही असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.