AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? जयंत पाटील CM फडणवीस यांच्या भेटीला, तटकरे-पटेलही सोबत

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. पाटील यांच्यासोबत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही सोबत आहेत.

मोठी बातमी! पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? जयंत पाटील CM फडणवीस यांच्या भेटीला, तटकरे-पटेलही सोबत
jayant patil CM MeetingImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 14, 2026 | 11:22 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा पक्ष NDA सोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. पाटील यांच्यासोबत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही सोबत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आले आहे. सध्या या चारही बड्या नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.

जयंत पाटील फडणवीसांच्या भेटीला

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आता जयंत पाटीलही वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाले आहेत. तब्बल अर्धा तासापासून या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. यात शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाण्याबाबत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही काळापासून ज्या राजकीय चर्चा सुरू आहे, त्यामुळे या भेटीला खास महत्त्व प्राप्त झाले आहे.

10 पैकी 9 आमदार एनडीएसोबत जाण्यास तयार?

आज जयंत पाटील यांच्या उपस्थितित महत्त्वाची बैठक पार पडली होती. यात पक्षाच्या दहापैकी 9 आमदारांची मते मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतली. हे आमदार एनडीएसोबत जाण्यास तयार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर खासदारांशी देखील बोलल्याची माहिती आहे. आता पक्षाध्यक्ष शरद पवारांशी बोलून निर्णय घेऊ, असे जयंत पाटील यांनी खासदार-आमदारांना सांगितलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

रोहित पवारांची भूमिका महत्त्वाची

जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 2029 च्या निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी भाजप आणि एनडीएसोबत जाणे आवश्यक असल्याचे मत आमदारांनी सांगितले. आता चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. एनडीएसोबत जाणाच्या पर्यायावर शरद पवार काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र दुसरीकडे 9 आमदारांच्या बैठकीपासून आमदार रोहित पवार दूर होते. त्यांचा भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध असल्याचे समजतेय. या बैठकीनंतर रोहित पवारांनी देखील सर्व आमदारांशी फोनवर बोलून मत जाणून घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक