Eknath Shinde Vs NCP : आधी आपल्या बुडाखाली काय जळतेय ते पहावे, एकनाथ शिंदेंच्या ट्विटला राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या ट्विटला राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलंय. यामुळे शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद निर्माण झालाय.

Eknath Shinde Vs NCP : आधी आपल्या बुडाखाली काय जळतेय ते पहावे, एकनाथ शिंदेंच्या ट्विटला राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
शरद पवार, एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 27, 2022 | 12:00 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात सुनावणी आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात (Court) धाव घेण्यात आलीय. त्याबाबत सुनावणी असताना राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्यात ट्विटरवार सुरू असल्याचं दिसतंय एकनाथ शिंदे यांच्या ट्विटला राष्ट्रवादीनं (NCP) उत्तर दिलंय. ‘मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?’ असं ट्विट शिंदे यांनी केलं होतं. त्याला राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलंय. यामुळे शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद निर्माण झालाय.

राष्ट्रवादीचा पलटवार

राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना म्हटंलय की,  ‘ED च्या भीतीमुळे भाजपच्या दावणीला गेलेल्या शिंदे यांनी नवाब मलिक यांच्यासारख्या लढाऊ नेत्यावर केलेली टीका हास्यास्पद आहे. नवाब मलिक यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, हे महाराष्ट्र जाणतो. आधी आपल्या बुडाखाली काय जळतेय हे पाहावे आणि मग मलिक यांच्यासारख्या लढवय्या नेत्याविरुद्ध बोलावे,’ असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलंय. सूरज चव्हाण हे राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत

एकनाथ शिंदेंचं ट्विट