Sudhir Mungantiwar : मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही… मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर फडणवीस जाहीरपणे काय म्हणाले?
सुधीर मुनगंटीवार यांनी आपण ताकद नसतानाही काम करत असल्याचे म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पालिका निवडणुकीत त्यांना पूर्ण ताकद देण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसने वडेट्टीवार यांना नेता बनवले तरी चंद्रपूरला मंत्रीपद मिळाले नाही, असे मुनगंटीवार भावनिक होत म्हणाले. भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून चंद्रपूरची महानगरपालिका जिंकण्याचे ध्येय आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच म्हटले की, “मला ताकदीची गरज नाही, ताकद नसताना सुद्धा मी काम करतो.” त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना ताकद कमी पडल्यास आगामी पालिका निवडणुकीत ती पूर्णपणे देऊ असे आश्वासन दिले. मुनगंटीवार यांनी यावेळी काही प्रमाणात भावनिक होत काँग्रेसने वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता बनवल्याचे नमूद केले, परंतु चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना एकही मंत्रीपद मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली. मंत्री नसतानाही आपण पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता मिळवली आणि बल्लारशा येथील तालुकास्तरीय न्यायालय महाराष्ट्रातील सर्वोत्तम असल्याचे सांगितले. यावर बघा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग

