AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार

Loksabha Election 2019 Live Updates : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो दिसणार आहे. लोकसभेसाठी कधीपासून मतदान? महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मतदान LIVE UPDATE : […]

LIVE : 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

Loksabha Election 2019 Live Updates : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो दिसणार आहे.

लोकसभेसाठी कधीपासून मतदान? महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मतदान

LIVE UPDATE :

  • महाराष्ट्रात 8 कोटी 73 लाख मतदार
  • महाराष्ट्र निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार

  • पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
  • दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
  • तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
  • चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

कुठल्या टप्प्याचं कधी मतदान :

  • पहिला टप्पा- 11 एप्रिल
  • दुसरा टप्पा – 18 एप्रिल
  • तिसरा टप्पा – 23 एप्रिल
  • चौथा टप्पा – 29 एप्रिल
  • पाचवा टप्पा – 6 मे
  • सहावा टप्पा – 12 मे
  • सातवा टप्पा – 19 मे

कुठल्या टप्प्यात किती मतदारसंघात मतदान?

  • पहिला टप्पा – 91 सीट (20 राज्य)
  • दुसरा टप्पा – 97 सीट (13 राज्य)
  • तिसरा टप्पा – 125 सीट (14 राज्य)
  • चौथा टप्पा – 71 सीट (9 स्टेट्स)
  • पाचवा टप्पा – 51 सीट (7 राज्य)
  • सहावा टप्पा – 59 सीट (7 राज्य)
  • सातवा टप्पा – 59 सीट (8 राज्य)

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार
  • येत्या 11 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार
  • लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार
  • ईव्हीएम मशिनचं GPS ट्रॅकिंग होणार
  • मतदार थेट तक्रार दाखल करु शकतात, C-Vigil App लॉन्च
  • कुणी आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास नागरिक व्हिडीओ तयार करुन निवडणूक आयोगाला पाठवू शकतात
  • ईव्हीएमवर उमेदवारांचे फोटो छापणार
  • 71 हजार परदेशी मतदार
  • 2014 च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले
  • आजपासून देशभरात आचारसंहित लागू
  • लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 10 लाख मतदान केंद्र – निवडणूक आयुक्त
  • विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सणांचा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत विचार केला आहे – निवडणूक आयुक्त
  • ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचाही वापर करणार – निवडणूक आयुक्त
  • 18-19 वर्षे वय असलेले दीड कोटी मतदार – निवडणूक आयुक्त
  • लोकसभेसाठी देशातील 90 कोटी मतदार मतदान करतील – निवडणूक आयुक्त
  • विविध राज्यांमधील परीक्षांचा विचार केला – निवडणूक आयुक्त
  • निवडणुकीसाठी आमच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण – निवडणूक आयुक्त
  • केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु
  • लोकसभा निवडणुकीच्या तारखा काही क्षणात जाहीर होणार
  • काही क्षणात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, निवडणुकांची घोषणा होणार
  • संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
  • पुढच्या एका तासात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार

महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभा?

महाराष्ट्रात तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबतच होतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबत होणार नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या दरम्यान संपणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन-तीन महिन्यात या निवडणुका अपेक्षित असतात.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. जागावाटपापासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंत सर्वच हालचालींना वेग आला आहे. अनेक पक्षांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचारही सुरु केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं बिगुल महिन्या-दोन महिन्याभरापूर्वीच वाजले आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना आणखी वेग येईल.

संबंधित बातम्या

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा 

महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून मतदान, 23 मे रोजी निकाल   

महाराष्ट्रातील सद्यस्थिती, कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार? 

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच