Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…

Tukaram Mundhe: सध्या राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी तुकाराम मुंढे करत असलेल्या कारवायांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले...
Tukaram Mundhe and CM
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 18, 2026 | 12:59 PM

कडक, प्रामाणिक आणि अतिशय बेधडक अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे सध्या राज्यात चर्चेत आहेत. गेल्या काही वर्षांत मुंढे हे अशा निवडक IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांनी जनतेचा विश्वास जिंकला आहे. अनेकांनी तुकाराम मुंढे यांची कारवाई करण्याची स्टाईल पाहून त्यांना सिंघम असे म्हणण्यास सुरुवात केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी तुकाराम मुंढे करत असलेल्या कारवायांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एफडीएचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना एफडीएच्या कारवाईबाबत प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, मला असं वाटतंय राज्यात FDAकडून उत्तम कारवाई सुरू आहे. सगळ्यात पहिले तर फूड अडल्ट्रेशन किंवा कोणत्याही प्रकारचे मानक आहेत त्यांच्यावर जेव्हा कोणी प्रश्न उपस्थित करतात तेव्हा लोकांच्या जीवाला धोका असतो.

“एफडीएची कारवाई सतत होत राहणार”

पुढे ते म्हणाले की, लोकांचे आरोग्य धोक्यात असते. त्यामुळे त्यावर सक्त कारवाई करणे गरजेचे होते आणि ही कारवाई होत आहे. याचा मला आनंद आहे की अशा प्रकारची कारवाई सुरु आहे. ही एफडीएची कारवाई सतत होत राहणार आहे. FDAकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत मला आनंद आहे.

शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी, आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडून FDIच्या सुरु असलेल्या कारवाईंचे कौतुक पाहून नागरिक देखील आनंदी झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us