Jalgaon DCC Bank Election: जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व! बिनविरोधचा धडाका; घराणेशाही जोरात, किती जागांवर विजय?
जिल्हा बँकेवर आधीच पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन असे दिग्गज नेते बिनविरोध निवडून आले आहेत. दुसरीकडे इतर जागांवरही महायुतीने बिनविरोध करण्याचा धडाका लावला असून नेत्यांचीच घरातील मंडळी निवडून येताना दिसत आहेत.

किशोर पाटील, प्रतिनिधी: Jalgaon DCC Bank Election 2026: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र या निवडणुकीत महायुतीने बिनविरोधचा धडाका लावला आहे. जिल्हा बँकेवर आधीच पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन असे दिग्गज नेते बिनविरोध निवडून आले आहेत. दुसरीकडे इतर जागांवरही महायुतीने बिनविरोध करण्याचा धडाका लावला असून नेत्यांचीच घरातील मंडळी निवडून येताना दिसत आहेत.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा धडाका!
जळगाव जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या 12 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 6 , भाजप 3 , राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 अशा 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटांकडून देवयानी देशमुख यांचा अर्ज कायम असल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
जळगाव जिल्हा बँकेची 21 जागांसाठी निवडणूक पार पडत असून त्यापैकी निम्या जागा महायुतीच्या बिनविरोध झाल्या आहेत. आज माघारीचा शेवटचा दिवस होता यात महायुतीचा निर्णय झाल्यामुळे प्रतिस्पर्धी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली. मात्र महायुतीच्या नेत्यांकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले असून नऊ जागांवर प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
घराणेशाही सुसाट!
या बिनविरोध झालेल्यांच्या यादीमध्ये मंत्री संजय सावकापे यांच्या पत्नी रजनी सावकारे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, खासदार उज्ज्वल निकम यांचे पुपणे रोहित निकम, जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, शिवसेना शिंदेसेनेचे आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी पाटील तसेच पत्नी मृणाल पाटील आदी नेत्यांच्या घरातील मंडळीच बिनविरोध निवडून आले आहेत.
