AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gemini Ganesan : अभिनेत्रीसोबत अफेअर अन् दिला सुपरस्टार मुलीला जन्म, वयाच्या 78व्या वर्षी तिसरं लग्न; चर्चेत राहिलेलं प्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य

Actor Personal Life : हा प्रसिद्ध अभिनेता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. अभिनेत्यानं तीन लग्न केलेली. तसेच लग्न न करताच दोन मुलींना जन्म दिला असून त्यातली एक मुलगी आज बॉलिवूडची सुपरस्टार आहे.

Gemini Ganesan : अभिनेत्रीसोबत अफेअर अन् दिला सुपरस्टार मुलीला जन्म, वयाच्या 78व्या वर्षी तिसरं लग्न; चर्चेत राहिलेलं प्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य
| Updated on: Nov 17, 2026 | 5:24 PM
Share

रेखा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळवली आहे. त्यांचे वडील जेमिनी गणेशन आणि आई पुष्पवल्ली, यांनीही मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू पसरवली. दोघेही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते होते. रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन, ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्याही चर्चा झाल्या. त्यांनी एकदा-दोनदा नव्हे, तर तीनदा लग्न केलं.

जेमिनी गणेशन यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1920 रोजी तामिळनाडूतील पुदुकोट्टाई येथे झाला होता. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1947 साली आलेल्या ‘मिस मालिनी’ या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून केली. 1952 साली आलेल्या ‘थाई उल्लम’ या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी “कलथूर कन्नम्मा,” “उन्नाल मुडियाम थांबी,” “वंजिक्कोट्टाई वलिबन,” “पार्थिबन कनावू,” “वीरपांडिया कट्टाबोमन,” “देवथा” आणि “मिसियम्मा” यांसारख्या चित्रपटांद्वारे ओळख मिळवली. जेमिनी तमिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले.

जेमिनी गणेशन यांनी तीन लग्न केली

जेमिनी गणेशन यांचं पहिले लग्न 1940 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी अलमेलूसोबत झालं होतं. या जोडप्याला जयलक्ष्मी, नारायणी, रेवती आणि कमला, अशा चार मुली आहेत. त्यानंतर पुष्पवल्लीसोबत काम करत असताना जेमिनी तिच्या प्रेमात पडले. दोघं रिलेशनशिपमध्ये होते. जेमिनी आणि पुष्पवल्ली यांना लग्न न करताच रेखा आणि राधा या दोन मुली झाल्या. जेमिनी गणेशन नंतर अभिनेत्री सावित्रीच्या जवळ आले. पुष्पवल्लीला त्यांच्या अफेअरबद्दल समजलं आणि त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. जेमिनी यांनी 1954 मध्ये सावित्रीशी दुसरं लग्न केलं.

वयाच्या 78 व्या वर्षी तिसरं लग्न

जेमिनी यांची दुसरी पत्नी सावित्रीचं 1981 मध्ये निधन झालं. तिच्या मृत्यूआधी, सावित्री 18 महिने कोमामध्ये होती. आपल्या दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर सतरा वर्षांनी, जेमिनी यांनी 1998 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी ज्युलियानाशी तिसरं लग्न केलं, ती अभिनेत्यापेक्षा 36 वर्षांनी लहान होती. जेमिनी यांचं 2005 मध्ये निधन झालं.

Follow Us
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल