BREAKING : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला

| Updated on: Mar 26, 2023 | 7:32 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगात आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या भाषणाला आता कधीही सुरवात होण्याची दाट शक्यता आहे. असं असताना मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळत आहे.

BREAKING : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावात (Malegaon) आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या भाषणाला आता कधीही सुरवात होण्याची दाट शक्यता आहे. असं असताना मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली. त्यानंतर आज वेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकेकाळी एकाच पक्षात एकत्र काम करायचे. ते एकमेकांचे सहकारी होते. त्यामुळे त्यांच्यात वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असल्याचं याआधीदेखील समोर आलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. याशिवाय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या याआधी देखील भेटीगाठी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते त्यावेळी राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वत: राज ठाकरे यांना फोन करुन तब्येतीची विचारपूस केलेली. या सगळ्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध आगामी काळात आणखी चांगले होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजी पार्क येथील सभेत राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

राज ठाकरे यांची नुकतंच गुढीपाडव्याच्या दिवशी मालेगावात जाहीर सभा झालेली. या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला होता. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जिथे सभा होईल त्या ठिकाणी फक्त सभा घेण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी करु नये, तर जनतेसाठी काम करावं, अशी सूचना राज ठाकरे यांनी भर सभेत दिली होती. याशिवाय सरकार आणि प्रशासनाचं अजिबात लक्ष नसल्याचा आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांचं फक्त सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. याशिवाय राज ठाकरे यांनी आणखी काही मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली. शिवसेनेची आज झालेली परिस्थितीवरही राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आज थेट राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं बघायला मिळत आहे.