Maharashtra Breaking News Live : “राहुल गांधींना जाहीरपणे सांगतो, सावरकर आमचे दैवत….”

| Updated on: Mar 27, 2023 | 6:07 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : राहुल गांधींना जाहीरपणे सांगतो, सावरकर आमचे दैवत....
Image Credit source: tv9

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मालेगावात जाहीर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष. वंचित बहुजन आघाडी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणार. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज मुंबईत काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Mar 2023 08:23 PM (IST)

    “राहुल गांधींना जाहीरपणे सांगतो, सावरकर आमचे दैवत….’

    उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले? : – राहुल गांधींना जाहीर सांगतो – सावरकर यांच्यावर टीका सहन करणार नाही – सावरकरांच्या वाड्यात लहान असताना गेलो आहे – सावरकरांचे वडील हे टिळक भक्त – 14 वर्ष त्यांनी छळ सोसला – आपण एकत्र जरूर – देशाची लोकशाही वाचवण्यासाठी – पण फाटे फुटू देऊ नका – अन्यथा देश हुकूमशाही कडे जाईल – आम्ही पण सावरकर भक्त – भाजपा मधल्या सावरकर भक्तांना सांगतो – स्वतंत्र टिकवण्यासाठी एकत्र या –

  • 26 Mar 2023 07:50 PM (IST)

    गद्दार, ढेकूंसाठी तोफेची गरजच नसते : उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे : 

    मलाच कळत नाही आजच्या या सभेचं वर्णन करायचं? पंधरा दिवसांपूर्वी खेडला अतिविराट सभा होती. अभूतपूर्व असं ते दर्शन होतं. आजची सभा अथांग पसरलेली आहे. संजय राऊत आपण जे म्हणात ते बरोबर आहे. आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातात काही नाही तरीदेखील एवढी गर्दी ही सगळी पूर्वजांची पुण्यायी. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी अद्वय आपण शपथ घेतली. पण मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी लढायचं. आता एकच जिंकेपर्यंत लढायचं.

    गद्दार, ढेकूंसाठी तोफेची गरजच नसते. आज बऱ्याच वर्षांनी मालेगावत आलेलो आहो. मालेगावकरांना धन्यवाद देतोय. मध्ये जगभरात कोरोना संकट आलं होतं. दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईतील धारावी आणि दुसरं मालेगाव. रोज रिपोर्ट येत होते. पोलीस बंदोबस्ताला येत ते सगळे कोरोनाग्रस्त. कुणाचा थांगपत्ता लागला नाही. मी मालेगावातील धर्मगुरुंशी बोललो. तुम्ही तेव्हा सहकार्य केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं. मी घरात बसून सांगितलं ते तुम्ही ऐकलं त्यासाठी धन्यवाद मानतो. तुम्ही मला कुटुंबातील एक माणूस मानलं. हे गद्दारांच्या नशिबात असेल असं मला वाटत नाही

    अद्वय मर्द गढी, तिथून इथे आला आहे. भाऊसाहेब आणि प्रबोधनकारांचा उल्लेख केला. आज त्याचीच गरज आहे. आज दोन शेतकऱ्यांना भेटलो. रतन काका आणि कृष्णा भागवत. तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला नाही. एक कांदा ५० खोक्याला जात नसेल मग तुमच्या कष्टाला फळ मिळायला हवं. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही नसतं. आसमानी आणि सुलतानी दोन्ही एकत्र आलेलं आहे.

    दोन लाखांपर्यंत कर्ज होतं त्याचा लाभ मिळाला होता की नाही ते सांगा. सत्ता आल्यानंतर शेतकरी राजाला कर्जमुकक्ती करायचं हे पहिलं पाऊल होतं. गद्दारी झाली सरकार गेलं. आपलं सरकारला पाच वर्ष होणार होतं त्यादरम्यान टप्प्याटप्प्याने दिलासा देण्याचा विचार करत होतो. पण दुर्देवाने सरकार गेलं. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळायला हवा. शेतकऱ्यांनाकेवळ हमीभाव नाही तर हक्काचा भाव मिळायला हवा. मला उत्तर म्हणून इथे सभा घेणार आहात ना त्याआधी शेतकऱ्यांना उत्तर द्या.

    कृष्णा डोंगरे यांनी रक्ताने पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत, मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात. केंद्र सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधात आहे. त्यांच्याविरोधात पेटून उभा. पण बकरी विरोध करणार? मुख्यमंत्री शेतकरी आहेत. दिवाळीवेळी आपण पाहिलं होतं. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझा शेतकरी शेतात काम करतो तेव्हा कधी साप, विंचू डसतो. घरात लगीन कार्य असल्यावर शेतकरी शेतात काम करतात.

    खेडमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. काळोखात जाऊन नुकसान बघतात असे दिव्यदृष्टी असलेले आमचे कृषी मंत्री. महिलेला शिवीगाळ करतात आणि तरीही मंत्रिमंडळात आहेत. मांडीला मांडी लावून बसतात हे यांचं हिंदुत्व. शेतकरी आत्महत्येवर हे होतंच असतं असं म्हणायचं

  • 26 Mar 2023 07:39 PM (IST)

    'तुफान कोणी रोखू शकत नाही', संजय राऊत यांचं धडाकेबाज भाषण

    संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :

    तुफान कोणी रोखू शकत नाही या मालेगावत फिल्म इंडस्ट्री आहे तिला मालेगाव के शोले म्हणतात शिवसेना हे काय आहे ते पाहायचं असेल तर त्या निवडणूक आयोगाने इकडे येऊन पाहावं निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली नाही बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचं महाकाव्य निर्माण केलं समोर बसेलेले हे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत ही शिवसेना विधानसभेत पुन्हा भगवा फडकवेल आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करेल

    शिवसेना तुटलेली नाही, वाकलेली नाही, सर्व धर्माचे नागरीक शिवेसेनेच्या पाठीशी उभी आहे

    उद्धव साहेब आपल्यासारखा प्रमाणिक नेता आम्हाला मिळाला आहे. हा महाराष्ट्र आपल्यासमोर उसळून उभा राहिला आहे

    उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणावर संदेह केला जाऊ शकत नाही

    निम का पत्ता किती कडवा आहे ते आपल्या दाखवायचं आहे

    उत्तर महाराष्ट्र शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, कांद्याला भाव नाहीत. कांदा रस्त्यावर फेकला जातो. पण आपल्याला बाजूच्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचा आहे. गुलाबराव पाटलांना रस्त्यावर फेकायचा आहे, ज्यांनी गद्दारी केली त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे.

    उद्धव ठाकरे यांच्या मालेगावात येण्याने चैतन्य निर्माण झालं आहे

    अद्वय आपण कठीण काळात शिवसेनेचा हात धरला आहे. आम्हाला अभिमान आहे ज्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला त्या भाऊसाहेब हिरे यांचा वारसदार प्रबोधनकारांच्या वारसदाराच्या मांडीला मांडी लावून बसला आहे

    महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपलंच राज्य येईल. या महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील आणि शेतकरी, कष्टकऱ्याला सुखाचे दिवस येतील

  • 26 Mar 2023 07:30 PM (IST)

    उद्धव ठाकरे मालेगावात सभास्थळी दाखल

    मालेगाव : 

    उद्धव ठाकरे मालेगावात सभास्थळी दाखल

    अद्वय हिरे सध्या आपली भूमिका मांडत आहेत

  • 26 Mar 2023 07:20 PM (IST)

    उद्धव ठाकरे मालेगावात सभास्थळी रवाना

    नाशिक : 

    उद्धव ठाकरे मालेगावात सभास्थळी रवाना

    उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्नी ठाकरे यादेखील सभास्थळी रवाना

  • 26 Mar 2023 06:40 PM (IST)

    नाशिक सभास्थळी ठाकरे गटाचे दिग्गज नेते उपस्थित

    नाशिक : 

    नाशिक सभास्थळी ठाकरे गटाचे दिग्गज नेते उपस्थित

    उद्धव ठाकरे थोड्याच वेळात भाषणाला सुरवात करणार

  • 26 Mar 2023 05:44 PM (IST)

    उद्धव ठाकरे सपत्नीक मालेगावत दाखल, अद्वय हिरे यांच्याकडून स्वागत

    मालेगाव :

    उद्धव ठाकरे सपत्नीक मालेगावत दाखल झाले आहेत

    शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलंय

    अद्वय हिरे हे दिवंगत माजी मंत्री भाऊसाहेब हिरे यांचे वंशज आहेत

  • 26 Mar 2023 05:42 PM (IST)

    उद्धव ठाकरे मालेगावात दाखल

    नाशिक : 

    उद्धव ठाकरे यांचा ताफ मालेगावच्या प्रवेशद्वारातून आत शिरला आहे

    अवघ्या काही वेळात उद्धव ठाकरे हे मालेगाव इथल्या शासकीय विश्रामगृहात दाखल होतील.

  • 26 Mar 2023 03:45 PM (IST)

    पुणे | हॉकी खेळण्याचा वादातून चार जणांनी केला मित्राच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला

    टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तीन अल्पवयीन मुली गंभीर जखमी

    11, 15 आणि 16 वर्षीय मुलींवर करण्यात आला हल्ला

    पुण्यातील वारजे भागातून धक्कादायक घटना समोर

    या प्रकरणी रामनाथ सहानी, राम सहानी आणि दोन जणांना पोलिसांकडून अटक

  • 26 Mar 2023 03:30 PM (IST)

    मालेगावात काय लागले होर्डींग

    भावी खासदार म्हणून दादा भूसेंच्या मुलाचे मालेगावमध्ये लागले होर्डींग

    'अपकमिंग एमपी' अविष्कार दादा भूसे असा होर्डींगवर उल्लेख

    भुसे समर्थकांकडून लावले गेले होर्डींग

    एकीकडे उद्धव ठाकरे दादा भूसेंवर आज निशाणा साधणार असतानाच दुसरीकडे लागलेले हे होर्डींग ठरते आहे चर्चेचा विषय

  • 26 Mar 2023 02:58 PM (IST)

    नागपुरात काही भागात जोरदार पाऊस, काही भागात हलक्या सरी

    विदर्भात हवामान खात्याने आज पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

    त्यानुसार आज दुपारी अचानक वातावरणात बदल होत जोरदार पाऊस झाला.

    यात शहरातील काहो भागात 10 ते 15 मिनिट जोरदार पाऊस झाला तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या.

    आज आणि उद्या विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

  • 26 Mar 2023 02:57 PM (IST)

    BDDS ची टीम सभा स्थळी दाखल

    डॉग स्कॉड च्या माध्यमातून सभा स्थळाची कसून तपासणी

    व्यासपीठाच्या प्रत्येक काना कोपऱ्याची कसून तपासणी

    मालेगाव मध्ये उद्धव ठाकरेंच्या सभे पूर्वी विशेष दक्षता

    सभेला लाखांच्या घरात लोक येतील असा अंदाज

  • 26 Mar 2023 02:39 PM (IST)

    उध्दव ठाकरे यांच्या मार्गात बदल

    उध्दव ठाकरे यांच्या सभेला अवघे काही तास उरलेले असतांना मालेगावात काही घडामोडी घडतांना दिसत आहे..उध्दव ठाकरे ज्या ' मोसमपुल ' मार्गाने शहरात दाखल होणार होते त्या मार्गात सुरक्षिततेचे कारण देत पोलिसांकडून बदल करण्यात आला आहे..शहरातील टेहेरे चौफुली, सोयगाव, डी.के.चौक आदी मार्गाने उध्दव ठाकरे हे सभास्थळी दाखल होतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.मात्र अद्याप अधिकृत असा दुजोरा याबद्दल पोलिसांकडून देण्यात आलेला नाही.

  • 26 Mar 2023 02:39 PM (IST)

    नागपुरात काही भागात जोरदार पाऊस

    विदर्भात हवामान खात्याचा आज पावसाचा अंदाज

    आज दुपारी अचानक वातावरणात झाला बदल

    शहरातील काही भागात 10 ते 15 मिनिटे जोरदार पाऊस

    काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या

  • 26 Mar 2023 01:18 PM (IST)

    ठाणे : मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत इनकमिंग

    नाशिक येथील ठाकरे गटातील तसेच इतर पक्षातील कार्यकर्ते येणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश करणार

    ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे होणार पक्ष प्रवेश

    महिला आघाडी, तरुण तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

  • 26 Mar 2023 12:19 PM (IST)

    रत्नागिरीत परशुराम घाटातील वाहतूक काही दिवसांसाठी होणार बंद

    मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हा घाट बंद ठेवून काम जलद गतीने व्हावे यासाठी ठेकेदाराने मागितली परवानगी

    आठ दिवस घाट बंद करून घाटातील एक बाजू पूर्ण करण्यासाठी करणार प्रयत्न

    परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली तर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत राहील का? प्रशासनाकडून चाचपणी सुरू

    काही दिवसातच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक आठ दिवस बंद करण्याच्या हालचाली सुरू

  • 26 Mar 2023 12:14 PM (IST)

    क्रिकेटमध्ये नशीब म्हणजे काय असतं? त्यासाठी एकदा हा VIDEO बघा

    NZ vs SL : क्रिकेटमध्ये एखाद्या प्लेयरला नशिबाची साथ कशी मिळते? ते हा VIDEO बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. वाचा सविस्तर.....

  • 26 Mar 2023 12:10 PM (IST)

    उद्धव ठाकरे उर्दूसम्राट झाले

    मालाडमध्ये आयोजित मन की बात कार्यक्रमाला पोहोचलेले भाजप नेते कृपा शंकर सिंह यांनी मालेगावातील उद्धव ठाकरेंच्या सभेवर सांगितले की, बाळासाहेब ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट होते पण उद्धव ठाकरे जनाब उर्दूसम्राट झाले आहेत.

  • 26 Mar 2023 12:00 PM (IST)

    पनवेलमध्ये दोन शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा

    पनवेलच्या व्हीके हायस्कूलमधील घटना

    शाळेच्या गेटबाहेर दोन मुलींची झाली भांडण

    सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

    मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी जमली होती

  • 26 Mar 2023 11:28 AM (IST)

    पुण्यात महिला काँग्रेसचं मूक आंदोलन

    पुण्यात महिला काँग्रेसचं मूक आंदोलन.

    राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन.

    केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या महिला पदाधिकारी तोंडाला पट्ट्या बांधून करणार निषेध आंदोलन.

    आंदोलनकर्त्या महिलांनी काळे कपडे परिधान करत केला सरकारच्या निर्णयाचा विरोध.

  • 26 Mar 2023 10:14 AM (IST)

    IPL 2023 : आरसीबीला मोठा झटका, स्टार बॅट्समनशिवाय खेळाव लागणार

    IPL 2023 : सीजन सुरु होण्याआधीच RCB ची टीम संकटात सापडली आहे. हा मॅचविनर खेळाडू नसण्याचा मोठा फटका आरसीबीला बसेल. वाचा सविस्तर....

  • 26 Mar 2023 10:04 AM (IST)

    प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात राजघाटावर काँग्रेसचा संकल्प सत्याग्रह, हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार

    राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस राजघाटावर जमा होणार

    आंदोलनासाठी परवानगी नाही, परवानगी झुगारून होतंय आंदोलन

    भाजपची हुकूमशाही सहन करणार नाही, काँग्रेसचा निर्धार

  • 26 Mar 2023 09:38 AM (IST)

    राज ठाकरेंप्रमाणे उद्धव ठाकरे देखील एलईडीवर व्हिडियो लावणार

    मालेगाव मध्ये देखील 'लावा रे तो व्हिडियो' ?

    उद्धव ठाकरे यांच्या सभेस्थळी व्यासपीठावर मोठा एलईडी स्क्रीन

    स्क्रीनवर नेमकं काय दाखवणार याची उत्सुकता

    राज ठाकरें प्रमाणे उद्धव ठाकरे देखील एलईडीवर काय व्हिडियो लावणार याची उत्सुकता

  • 26 Mar 2023 09:17 AM (IST)

    पिंपरी- चिंचवडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग 

    पिंपरी- चिंचवडच्या कुदळवाडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

    रात्री सव्वा एकच्या सुमारास आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे

    एकूण 12 अग्निशमन दलाचे वाहने रात्री पासून आग विझवत असून आग आटोक्यात आली आहे

    कुलिंगचx काम सुरू असल्याच अग्निशमन विभागाने सांगितले

    अद्याप या आगीत कोणाचं किती नुकसान झालेय, हे समजू शकलं नाही

  • 26 Mar 2023 08:56 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात H3N2 बाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचलेली आहे

    -पिंपरी चिंचवड शहरात H3N2 बाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचलेली आहे

    -सुदैवाने यातील केवळ एकच रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित रुग्ण उपचारानंतर बरे झालेले आहेत.

    -दरम्यान H3N2 बाधित एका रुग्णाचा शहरात मृत्यू झालेला आहे

    -महापालिकेने H3N2 बाधितांवर उपचार करण्यासाठी वासीएम सह पाच रुग्णालयामध्ये स्वतंत्र इसोलेशन वॉर्ड बनवलेले आहेत

  • 26 Mar 2023 08:47 AM (IST)

    MI vs DC WPL Final : Harmanpreet kaur च्या मार्गात पुन्हा तोच अडथळा, तिसऱ्या प्रयत्नात यश मिळेल?

    MI vs DC WPL Final : Harmanpreet kaur एक हुशार कर्णधार आहे, पण.... वाचा सविस्तर

  • 26 Mar 2023 08:46 AM (IST)

    CSK Ravindra Jadeja : पडद्यामागे जे घडलं ते समोर आलं, CSK ने अशी दूर केली जाडेजाची नाराजी

    CSK Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाला CSK सोबत ठेवण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. रवींद्र जाडेजाने मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. धोनीची कुठली गोष्टी आवडली नाही, ते सुद्धा जाडेजाने सांगितलं. वाचा सविस्तर....

  • 26 Mar 2023 08:40 AM (IST)

    पुण्यातील शिवसृष्टीला राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी सुपूर्द

    दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून पुण्यात साकारत आहे शिवसृष्टी

    राज्य सरकारने जाहीर केलेला 50 कोटी रुपयांचा निधी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानकडे सुपूर्द

    यापूर्वी पुण्यातील आंबेगाव येथे होत असलेल्या शिवसृष्टीसाठी राज्य सरकारने 50 कोटींचा निधी मंजूर केला होता

    शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते झाले होते

    याच शिवसृष्टीचा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देखील लवकरच होणार

  • 26 Mar 2023 08:39 AM (IST)

    इंटरनेटशिवाय युट्युबवर एचडी व्हिडिओ पाहू शकता

    इंटरनेटशिवाय युट्युबवर एचडी व्हिडिओ पाहू शकता, फक्त हे छोटसं काम करावं लागेल!

    क्लिककरुन वाचा बातमी

  • 26 Mar 2023 08:37 AM (IST)

    रत्नागिरी : वाशी मार्केटमध्ये आंब्यांची आवक वाढली

    40 ते 45 हजार आंब्याच्या पेट्यांची वाशी मार्केटमध्ये आवक

    मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात येऊ लागल्याने आंब्याचे दर घसरले

    पंधराशे ते साडेचार हजार असा आंब्याच्या पेटीला दर

  • 26 Mar 2023 08:32 AM (IST)

    पिंपरी चिंचवड : शहरात H3N2 बाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचलेली

    सुदैवाने यातील केवळ एकच रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे

    H3N2 बाधित एका रुग्णाचा शहरात मृत्यू झाला

    महापालिकेने पाच रुग्णालयामध्ये स्वतंत्र इसोलेशन वॉर्ड बनवले

  • 26 Mar 2023 08:17 AM (IST)

    मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

    धामारी येथील पिराच्या ठिकाणी असलेला हिरवा झेंडा काढून भगवा ध्वज लावला

    एका मनसे कार्यकर्त्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल

    शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    पिरावरील झेंडा काढून त्याठिकाणी भगवा झेंडा लावताना व्हिडीओ व्हायरल

    नानासाहेब लांडे असे मनसे कार्यकर्त्याच नाव

  • 26 Mar 2023 08:04 AM (IST)

    मनसे कार्यकर्त्याने हिरवा झेंडा काढून भगवा ध्वज लावला

    पुणे : धामारी येथील पिराच्या ठिकाणी असलेला हिरवा झेंडा काढून भगवा ध्वज लावल्या प्रकरणी एका मनसे कार्यकर्त्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल

    शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

    पिरावरील झेंडा काढून त्याठिकाणी भगवा झेंडा लावताना व्हिडीओ व्हायरल

    नानासाहेब लांडे असे मनसे कार्यकर्त्याच नाव

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील सभेत प्रश्न उपस्थित केल्या नंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक.

  • 26 Mar 2023 07:42 AM (IST)

    पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर

    बारामती, इंदापूर आणि कर्जत जामखेडमध्ये बावनकुळे करणार 52 भाजप शाखांचे उद्घाटन

    लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजप लागली कामाला

    संध्याकाळी 5 वाजता बावनकुळे यांची इंदापुरात जाहीर सभा

    पवारांच्या बारामतीत आणि रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष

    चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर या दोन्ही मतदारसंघात करणार दौरे

  • 26 Mar 2023 07:38 AM (IST)

    पुण्यातील शिवसृष्टीला 50 कोटींचा निधी

    पुण्यातील शिवसृष्टीला राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी सुपूर्द

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून पुण्यात साकारत आहे शिवसृष्टी

    राज्य सरकारने जाहीर केलेला 50 कोटी रुपयांचा निधी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान कडे सुपूर्द

    यापूर्वी पुण्यातील आंबेगाव येथे होत असलेल्या शिवसृष्टीसाठी राज्य सरकारने 50 कोटींचा निधी मंजूर केला होता

    शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते झाले होते

  • 26 Mar 2023 07:37 AM (IST)

    कोल्हापूर मुंबई विमानसेवा 5 एप्रिलपासून सुरू होणार

    कोल्हापूर मुंबई विमानसेवा 5 एप्रिलपासून सुरू होणार

    आठवड्यातून चार दिवस सुरू होणार सेवा

    मंगळवार बुधवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी करता येणार कोल्हापूर मुंबई विमान प्रवास

    स्टार एअरवेजच्या माध्यमातून दिली जाणार सेवा

  • 26 Mar 2023 07:17 AM (IST)

    पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामाला वेग

    पुणे शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामाला मिळणार गती

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

    शहरातील एसआरए प्रकल्प राबवण्यासाठी नवीन नियमावली

    झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला मिळणार गती

    पुणे शहरातील अनेक एस आर ए प्रकल्प अर्धवट अवस्थेत

    अनेक नागरिक हक्काच्या घरापासून वंचित

    शहरातील कासेवाडी, मंगळवार पेठ ,लोहिया नगर ,नाना पेठ या भागात मिळणार एसआरए प्रकल्पांना गती

  • 26 Mar 2023 07:14 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

    वसंत मोरेंच्या कार्यक्रमाला राज ठाकरे लावणार हजेरी

    पुण्यातील गुजरवाडी येथे उभारण्यात आलेल्या डॉग पाँडचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

    वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे पुण्यात डॉग पाँड

    राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्याची शक्यता

    मनसेने पुण्यातील पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या अतिक्रमणाचा मुद्दा उचलल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे पुण्यात

    या दौऱ्यात राज ठाकरे पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना देणार सूचना

  • 26 Mar 2023 06:35 AM (IST)

    अयोध्येतील राम मंदिरासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वोत्तम सागवान लाकूड जाणार

    आलापल्ली येथील वनविकास महामंडळाच्या सॉ मिलमध्ये झाली सागवान लाकडाची कटाई

    अयोध्येत रामभक्तांचे स्वप्नातील मंदिर प्रत्यक्षात येत असताना गडचिरोलीच्या सागवानाला मिळाले भाग्य

    काष्ठ पूजनासाठी चंद्रपुरात देखील करण्यात आली आहे विशेष तयारी

  • 26 Mar 2023 06:34 AM (IST)

    वैष्णवी पाटीलची घोड्यावरून मलंगगड भागात मिरवणूक

    महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत पटकावलं उपविजेत पदक

    राज्यातील पहिला महिला कुस्ती केसरी स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटीलचं यश

    ग्रामस्थांनी तीच फटाके फोडून नेवाळी नाका ते मांगरूळपर्यंत घोड्यावरून मिरवणूक

    ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत हिललाईन पोलिसांनी देखील वैष्णवीचा सन्मान

    नांदिवली येथील व्यायामशाळेत सराव करत असलेल्या तालीम शाळेत देखील सन्मान

  • 26 Mar 2023 06:31 AM (IST)

    कल्याण शीळ रोड वर वाहनाने घेतला पेट

    काटई गावाजवळ अचानक वाहनाने घेतला पेट

    मात्र काही वेळाने या आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले

    अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली

  • 26 Mar 2023 06:29 AM (IST)

    भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचा आज सत्याग्रह

    राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजप सरकार विरोधात सत्याग्रह करण्यात येणार आहे

    सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सत्याग्रह करण्यात येणार

    माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा सत्याग्रहात सहभागी होणार

  • 26 Mar 2023 06:24 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; मालेगावात आज जाहीर सभा

    उद्धव ठाकरे आज 2.15 वाजता कलिना गेट नंबर 8 येथून मालेगावच्या दिशेने रवाना होतील

    3.15 वाजता नाशिक येथे आगमन

    3.50 वाजता साई रिसॉर्ट माळसाने जिल्हा नाशिक येथे फ्रेश होण्यासाठी थांबतील

    4.55 वाजता मालेगाव रेस्ट हाऊस येथे थांबतील

    सायंकाळी 6.30 वाजता सभेच्या ठिकाणी दाखल

    रात्री 9 वाजता सभे ठिकाणावरून नाशिकच्या दिशेने रवाना

Published On - Mar 26,2023 6:21 AM

Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.