AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता?

या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत.

सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता?
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 18, 2021 | 2:24 PM
Share

पंढरपूर : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील गटाची सत्ता आली आहे. अकलून ही 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यापैकी 13 जागा विजयसिंह मोहिते पाटील गटानं पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे.(The BJP is in power in Akluj, the largest gram panchayat in Asia)

अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते-पाटील गटानं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतंय.

संग्रामसिंह मोहिते-पाटलांचा पराभव

मोहिते-पाटील यांच्या पॅनलचे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास पॅनेलने अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर धरला होता. या पॅनलचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. लोकांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांनी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पॅनलला नाकारल्याचं दिसून येत आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील पॅनलचे गिरीराज माने-पाटील यांनी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला आहे. तर ज्योती कुंभार यांनी उमा शेटे यांनी पराभव केला आहे. संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच अकलूज ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषविलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

माळशिरस तालुक्यात काय स्थिती?

संपूर्ण माळशिरस तालुक्याचा विचार केला तर तालुक्यावर पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. कारण माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि भाजपसाठी मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा निकालही जाहीर झाला आहे. विठ्ठलवाडीमध्ये 7 पैकी 7 ही जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटानं आपला झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर उमेदवारांनी विजयी रॅली काढली. माळशिरससह पंढरपूर आणि सांगोल्यातही भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे.

रेडेर गणेशगाव आणि पिरळे ग्रामपंचायतीवरही भाजपच्या मोहिते पाटील गटाने सत्ता मिळवली आहे. त्याचबरोबर येळीव, विजयवाडी आणि खवळे ग्रामपंचायतीवरही विजयसिंह मोहिते पाटील गटाने विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या :

माळशिरस ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मोहिते पाटील गटाचं वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड

Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

The BJP is in power in Akluj, the largest gram panchayat in Asia

Follow Us
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत...
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
Kolhapur Protest | दिल्ली आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद! कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा.

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा

CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!.

CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!

रोहित शर्माचं दणदणीत शतक, तरीही संघातून आऊट? बीसीसीआय निवडकर्त्यांना काय खटकलं?.

रोहित शर्माचं दणदणीत शतक, तरीही संघातून आऊट? बीसीसीआय निवडकर्त्यांना काय खटकलं?

Ketan Agarwal Murder Case :  He Is Caring and ..सियाच्या तोंडून कौतुक ऐकून केतन प्रचंड खुश, साखरपुड्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल.

Ketan Agarwal Murder Case : He Is Caring and ..सियाच्या तोंडून कौतुक ऐकून केतन प्रचंड खुश, साखरपुड्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

प्रदर्शनापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या चित्रपटाची कोट्यवधींची कमाई; रजनीकांत यांचाही रेकॉर्ड मोडणार?.

प्रदर्शनापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या चित्रपटाची कोट्यवधींची कमाई; रजनीकांत यांचाही रेकॉर्ड मोडणार?