AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या अडचणीत वाढ, थेट आर्थिक व्यवहारांबाबत… मोठी अपडेट समोर

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्याशी संबंधित काही व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांबाबत ED कडून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या अडचणीत वाढ, थेट आर्थिक व्यवहारांबाबत... मोठी अपडेट समोर
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 9:26 AM
Share

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे डिफेंडर गाडीतून प्रवास करत असल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर ती गाडी मनोज जरांगे यांच्या मित्राची असल्याची समोर आली आणि त्यांनी ती गाडी मित्राला परत केली. आता मनोज जरांगे यांच्याशी संबंधित काही व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांबाबत ईडी उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू केली आहे. आर्थिक अनियमिततेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईडीने संबंधित तक्रारदारांचे जबाब नोंदवून पुरावे आणि कागदपत्रे मागवली आहेत. तसेच आयकर विभागासह अन्य सरकारी यंत्रणांकडूनही संबंधित तक्रारी आणि आर्थिक नोंदींची माहिती मागविण्यात आली आहे.

बीडमधील कार्यकर्ते अमोल सुखदेव खुणे यांनी दिलेल्या तक्रारीत मनोज जरांगे तसेच अन्य चार व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीत बेहिशेबी मालमत्ता, संशयित बेनामी मालमत्ता, सरकारी कंत्राटे आणि विविध आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनावरील खर्च, जमीन खरेदी-विक्री, वाळू व्यवसाय आणि विविध सरकारी विभागांकडून मिळालेल्या कंत्राटांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

तक्रारदाराने संबंधित आर्थिक व्यवहारांची रक्कम सुमारे १०० ते २०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असल्याचा दावा केला आहे. मात्र हा आकडा अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेला नाही. सध्या ईडीची चौकशी टी-१ गुप्तचर स्तरावर सुरू असून अद्याप ईसीआयआर दाखल करण्यात आलेले नाही किंवा मनी लाँड्रिंगचा औपचारिक गुन्हाही नोंदवण्यात आलेला नाही.

या चौकशीमुळे मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर चर्चा सुरू झाली आहे. ईडीने गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू ठेवल्याने अधिकृत माहिती मर्यादित आहे. मात्र तक्रारींमधील आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात अधिक पुरावे समोर आल्यास या प्रकरणाची अधिकृत नोंद होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Follow Us
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?