AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange on Amruta Fadnavis: भाऊ म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना जरांगे यांचे स्पष्टच उत्तर, संकटात असताना….

Manoj Jarange on Amruta Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. ‘मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत’ असं म्हणत त्यांनी जरांगेंना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Manoj Jarange on Amruta Fadnavis: भाऊ म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना जरांगे यांचे स्पष्टच उत्तर, संकटात असताना....
| Updated on: Sep 10, 2026 | 11:53 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. ‘मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत’ असं म्हणत त्यांनी जरांगेंना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

अंतरवाली सराटीमधून माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘हे बघा ताईंनी सांगितलं आहे ना मग जेवायला पण जाऊ ना. ताईंनी सांगितलं ना पण भाऊबीजेच्या वेळी. आता आंदोलन सुरु आहे. आता बहिणीने या वेळी बोलवू नये. भाऊ मैदानात असताना बोलवू नये. भाऊ संकटात जातो. बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा आमचा. आज मात्र जेवायला बोलवू नये. आमच्या बहिणींने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं साडी चोळी घेऊन जातो. दिलेला शब्द आहे मनोज जरांगेचा. साडी चोळी घेऊन जातो. जेवयला जातो. फक्त आज लढायच्या मैदानातून तुम्ही जेवायला या म्हणाल तर हार पत्कारावी लागेल ताई. ताईने तो विचार आणि दृष्टीकोन आणि ती मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी’.

ताईने ज्या भावनेने आपल्याला आवाहन केले…

पुढे ते म्हणाले की, “एखादा माणूस चांगल्या भावनेनं एखादा विषय म्हणाला तर माणसाने प्रत्येक वेळी आड्यव्यात घुसायची गरज नाही. प्रश्न आणि त्याचे उत्तर ताईने ज्या भावनेने आपल्याला आवाहन केले आहे, ज्या मायेने दयेने केले आहे त्याच मायेने दयेने आपण दिले आहे. पण फक्त आताची ती वेळ नाहीये जेवायची एवढंच म्हणणं आहे. शिकारीच्या टायमाला इकडे तिकडे जाणे योग्य नाही.”

“ताईकडे जातो ना. साडी-चोळी घेऊन जातो”

शेवटी ते म्हणाले की, “भावाचं नातं लावल्यानंतर आपण भाऊबीजेला जाऊ ना आपण त्यात अडचण नाही. पण आज भाऊ इकडे संकटात आहे. कोणाच्या तरी गरीबाच्या लेकरासाठी लढत आहे. त्यावेळी जेवायला गेल्यावर कसं होणार? ताईकडे जातो ना. साडी-चोळी घेऊन जातो पण भाऊबीजेच्या वेळी.”

Follow Us
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव