Ayodhya Ram Mandir | ‘आमच्या संयमाची तुम्ही….’, स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांचा मौलाना तौकीर रजांना इशारा

Ayodhya Ram Mandir | जशी-जशी 22 जानेवारीची तारीख जवळ येत चाललीय, तसतसा राजकीय वक्तव्यांना सुद्धा वेग आला आहे. अयोध्येत राम मंदिराच भव्य उद्घाटन होणार आहे. इत्तेहाद-ए-मिल्लत कौंसिल (IMC) प्रमुख मौलाना तौकीर रजा यांनी ज्ञानवापी संदर्भात एक वक्तव्य केलं. त्याला अखिल भारतीय संत समितिचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी प्रत्युत्तर दिलं.

Ayodhya Ram Mandir | आमच्या संयमाची तुम्ही...., स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांचा मौलाना तौकीर रजांना इशारा
maulana taukir raza vs swami jitendranand saraswati
| Updated on: Jan 06, 2024 | 10:44 AM

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. रामलला 22 जानेवारीला नव्याने बनवण्यात आलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होतील. रामललाच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. जशी-जशी 22 जानेवारीची तारीख जवळ येत चाललीय, तसतसा राजकीय वक्तव्यांना सुद्धा वेग आला आहे. इत्तेहाद-ए-मिल्लत कौंसिल (IMC) प्रमुख मौलाना तौकीर रजा यांच्या वक्तव्यावर आता अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी पलटवार केलाय.

IMC प्रमुख मौलाना तौकीर रजा यांनी गुरुवारी टीवी 9 भारतवर्षला इंटरव्यू दिला. त्यात ते म्हणाले की, बाबरीच्या मुद्यावर आम्ही संयम दाखवला. पण ज्ञानवापीच्या विषयात आम्ही तसाच संयम नाही दाखवू शकतं. त्यावर अखिल भारतीय संत समितिचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी प्रत्युत्तर दिलय. उत्तर प्रदेश सरकारने या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. देश संविधानाने चालणार. ज्ञानवापी न्यायिक विषय आहे. यावर कुठल्याही पद्धतीच मतप्रदर्शन करण्यास कोर्टाने मनाई केली आहे.

‘तुमच्या पूर्वजांनी आमची मंदिर तोडली’

“अयोध्या मुद्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई दिली. तिथे आम्ही जिंकलो. राम मंदिरासाठी सद्भावना चर्चेने तोडगा काढलेला नाही” असं स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले. तौकीर रजा यांना स्वामी जितेंद्रानंद यांनी इशारा दिला. “तुमच्या पूर्वजांनी आमची मंदिर तोडली, आमच्या संयमाची परीक्षा पाहून नका” राम मंदिरावरुन सुरु असलेल्या राजकारणावर ते म्हणाले की, “राजकारणाने आपली मर्यादा पाळली पाहिजे. धर्माने आपल्या मर्यादेत रहाव. धर्माच विवेचन करण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय नेत्याला नाहीय”

‘हे फक्त राम मंदिर नाही, राष्ट्र मंदिर’

“ज्यांना राम जन्मभूमी आणि प्रभू रामचंद्रांबद्दल कुठलीही श्रद्धा नाहीय, अशा छोट्या मानसिकतेचे लोक चुकीची वक्तव्य करत आहेत. हे फक्त राम मंदिर नाही, राष्ट्र मंदिर आहे. यात सगळ्यांना स्थान देण्यात आलय” असं स्वामी जितेंद्रानंद सरस्वती टीवी 9 शी बोलताना म्हणाले.