Ramnath Kovind | राष्ट्रपती पदावरून हटताच रामनाथ कोविंद यांच्यावर मेहबुबा मुफ्तींचे टीकास्त्र, काय आहेत गंभीर आरोप?

| Updated on: Jul 25, 2022 | 3:19 PM

भारत सरकारच्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशातील 20 कोटी लोकांच्या घरावर तिरंगा फडकवला जाईल. मात्र महबूबा मुफ्ती यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

Ramnath Kovind | राष्ट्रपती पदावरून हटताच रामनाथ कोविंद यांच्यावर मेहबुबा मुफ्तींचे टीकास्त्र, काय आहेत गंभीर आरोप?
Follow us on

नवी दिल्लीः नवी दिल्लीत आज देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. 24 जुलै रोजी रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द संपुष्टात आली. आज रामनाथ कोविंद (Ramnath Kavind) हे राष्ट्रपती पदावरून हटताच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mahboba Mufti) यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. माजी राष्ट्रपती यांनी आपल्यामागे एका असा ऐतिहासिक वारसा ठेवलाय, ज्यात भारतीय संविधान पायदळी तुडवण्यात आले. महबूबा मुफ्ती यांनी यासंबंधी एक ट्विट केले. त्यात म्हणाल्या, आर्टिकल 370 असो किंवा नागरिकत्व (CAA) कायदा असो किंवा अल्पसंख्यांक, दलितांना टार्गेट करणं असतो. त्यांनी भारतीय संविधानाच्या नावावर भाजपाचा राजकीय अजेंडा पूर्ण केला. यापूर्वीदेखील महबुबा मुफ्ती यांनी हर घर तिरंगा अभियानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांच्या या आदेशानुसार, जम्मू काश्मीरमधील प्रशासन विद्यार्थी, दुकानदार आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महबुबा मुफ्तींचे आणखी आक्षेप काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादीचा अमृत महोत्सव अर्तंगत सर्व नागरिकांना 13 ते 15 ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याटे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. भारत सरकारच्या या अभियानाअंतर्गत देशातील 20 कोटी लोकांच्या घरावर तिरंगा फडकवला जाईल. मात्र महबूबा मुफ्ती यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, ‘ आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सादरा करतो. कारण आम्ही स्वतंत्र झालो आहोत. एक देश आहोत. जम्मू काश्मीर हे एक मुस्लिम राज्य असूनही आम्ही पाकिस्तानसोबत गेलो नाहीत. आम्ही सेक्युलरिझमसाठी भारताचा झेंडा स्वीकारला. पण आज हे लोक प्रत्येक घरात घुसून झेंडा लावत आहेत. खरं तर हे लोक भगवा झेंडा मानणारे आहेत. तिरंग्याचा आदर नसणारे लोक आमच्या घरात घुसून झेंडे लावत आहेत, असा आरोप महबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी

देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून आज द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली. देशाचे सरन्यायाधीश व्ही एन रमण्णा यांनी त्यांना शपथ दिली. द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिले आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या आहेत. ओडिशातील आदिवासी कुटंबात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू या उत्तम राजकारणी समाजसेवेसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे.