Nana Patole : दुपारचं जेवण मुंबईत तर रात्रीचं दिल्लीत..! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर काय म्हणाले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ?

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरपयोग सुरु आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हेतर अनेक राज्यात याचा प्रत्यय येत आहे. आता मंगळवारी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात, ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरीच येऊन चौकशी करावी अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. पण त्या आजारी असतानाही त्यांना कार्यालयातच बोलवण्यात आले आहे.

Nana Patole : दुपारचं जेवण मुंबईत तर रात्रीचं दिल्लीत..! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर काय म्हणाले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ?
नाना पटोले, कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 2:22 PM

नागपूर :  (Expansion of the Cabinet) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. मंत्रिमंडळाची सर्व निर्णय हे दिल्लीतील (BJP) भाजपाची महाशक्ती असलेले नेते ठरवितात. त्यामुळे सध्या कठीण प्रसंगात राज्याला वाऱ्यावर सोडत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दुपारच्या जेवणासाठी मुंबईत तर रात्री दिल्लीत आणि पुन्हा सकाळी मुंबईत अशी त्यांची वारी सुरु आहे. आता कायद्याच्या चाकोरीत हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे सर्वकाही स्थिरस्थावर करण्यासाठी त्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. त्यांना ना राज्याचे काही देणं-घेणं आहे ना येथील शेतकऱ्यांचे. हे राष्ट्रीय नेत्यांना महाशक्ती म्हणतात पण खरी महाशक्ती ही जनतेच्या हातामध्ये आहे आणि वेळ आल्यावर त्याचा साक्षात्कार यांना नक्की होईल म्हणत (Nana Patole) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्लीवारीवर बोचरी टीका केली आहे.

कॉंग्रेसचे मंगळावारी सत्याग्रह आंदोलन

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरपयोग सुरु आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हेतर अनेक राज्यात याचा प्रत्यय येत आहे. आता मंगळवारी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात, ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरीच येऊन चौकशी करावी अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. पण त्या आजारी असतानाही त्यांना कार्यालयातच बोलवण्यात आले आहे. जाणून-बुजून त्यांना त्रास दिला जात असल्याने मंगळवारी राज्यात कॉंग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असल्याचे नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांना पश्चाताप होईल

सध्या सर्वकाही अलबेल वाटत असले तरी कायम परस्थिती अशीच राहील असे नाही. कारण दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर उपकार केले जात असले तरी काही दिवसांनी एकनाथ शिंदे यांनाच पश्चाताप होईल असे विधान पटोले यांनी केले आहे. भाजपा आता कुणाचीच राहिलेली नाही ती शिंदेची काय होणार असे म्हणत सध्याच्या भाजपाकडून ईडी पिडीत राज्य चालवले जात असल्याचा घणाघातही पटोले यांनी केला आहे. कितीही भ्रष्टाचारी नेता असला तरी तो भाजपाच गेल्यावर शुध्द होतो असे म्हणत जे भाजपात प्रवेश करतात त्यांना खोचक टोला लगावला आहे.

शेतकरी वाऱ्यावर हे दिल्ली दौऱ्यावर

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात 9 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भात घरांची पडझड आणि शेतीचे नुकसान झाले असताना याकडे सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. सध्या राज्यातील शेतकरी वाऱ्यावर आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुशंगाने दिल्ली दौऱ्यावर जात आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी कॉंग्रेस खंबीरपणे उभी असून स्थानिक पातळीवर होत असलेल्या नुकसानीचा आढावा कार्यकर्ते, पादाधिकारी आमदारांनी घेण्याचे आवाहन पक्षाच्या माध्यमातून केल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.