भरत गोगावलेंकडून निवडणुकीआधी अघोरी पूजा, वसंत मोरेंचा गंभीर आरोप, तो व्हिडीओही समोर आणला!

वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वसंत मोरे यांनी एक व्हिडीओही समोर आणला आहे,

भरत गोगावलेंकडून निवडणुकीआधी अघोरी पूजा, वसंत मोरेंचा गंभीर आरोप, तो व्हिडीओही समोर आणला!
bharat gogawale aghori pooja
| Updated on: Jun 16, 2025 | 4:46 PM

Vasant More On Bharat Gogawale : एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना उद्देशून काही विधानं केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ झाला. गोगावले यांच्यावर विरोधकांनी टीका केली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी घरात अघोरी पूजा केली, असा आरोप मोरे यांनी केला आहे.

वसंत मोर नेमकं काय म्हणाले?

वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. हे आरोप करताना मोरे यांनी काही व्हिडीओदेखील समोर आणले आहेत. भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली होती. त्यासाठी गोगावले यांनी गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणले होते. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ही अघोरी पूजा केली होती, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केलाय. हा आरोप करताना भरत गोगावले यांनी काही व्हिडीओही समोर आणले आहेत.

भरत गोगावले रश्मी ठाकरेंविषयी काय म्हणाले होते?

भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षफुटीवर भाष्य केलं. आम्ही शिवसेनेच्या बाहेर पडायला अनेक कारणं आहेत. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप हवा यावर विचार करायला पाहिजे. पडद्यामागून वहिनींचा बराच हस्तक्षेप होता. आम्हाला बाळासाहे ठाकरे यांची जी कामाची पद्धत होती ती उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसली नाही. महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना द्यायला हवं होतं. आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद द्यायला नको होतं, असं भरत गोगावले म्हणाले.

भरत गोगावले नेमकं काय उत्तर देणार?

गोगावले यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी तर गोगावले यांनी त्यांच्या घरात अघोरी पूजा केली, असा आरोप केला. त्यामुळे आता गोगावले नेमकं काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.