AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरा भाईंदरमध्ये भाजपला धक्का, अपक्ष आमदार गीता जैन यांच्या हाती शिवबंधन

बदलत्या राजकीय परिस्थितीत गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सत्तेचं पारडं उलटं फिरण्याचीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत

मिरा भाईंदरमध्ये भाजपला धक्का, अपक्ष आमदार गीता जैन यांच्या हाती शिवबंधन
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 24, 2020 | 2:40 PM
Share

मिरा भाईंदर : मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. आमदार गीता जैन यांनी एकट्यानेच शिवसेनेत प्रवेश केला, मात्र भाजपचे नगरसेवक मॉरिस रॉड्रिक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे आणि विजय राव यांच्यास जवळपास 10 नगरसेवक गीता जैन यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Mira Bhainder Independent MLA Geeta Jain to join Shivsena Live Update)

[svt-event title=”गीता जैन यांच्या हाती शिवबंधन” date=”24/10/2020,12:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

गीता जैन विरुद्ध नरेंद्र मेहता वाद

भाजपच्या सहयोगी राहिलेल्या गीता जैन यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा जैन यांनी पराभव केला होता. मीरा-भाईंदर शहरामध्ये भाजपात दोन गट पडले आहेत. यामध्ये एक गट विद्यमान आमदार गीता जैन यांचा, तर दुसरा माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा आहे. जैन आणि मेहता यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

मिरा भाईंदर महापालिकेत आता भाजपची सत्ता आहे. भाजपचेच महापौर असून पक्षाचे 61 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 22, तर काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत. पालिकेत सत्तेसाठी 48 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपचे 61 नगरसेवक असल्यामुळे दहा नगरसेवक आमदार गीता जैन यांच्यासोबत गेले, तरीही भाजपच्या सत्तेवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.

सध्या मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक ज्योती हसनाळे भाजपच्या महापौर आहेत. यानंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सत्तेचं पारडं उलटं फिरण्याचीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मिरा भाईंदरमध्ये जैन समाजाची संख्या जास्त असल्याने येणाऱ्या काळात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. (Mira Bhainder Independent MLA Geeta Jain to join Shivsena Live Update)

गीता जैन यांची नाराजी

अपक्ष निवडणूक जिंकल्यावर गीता जैन यांनी भाजपला समर्थन दिलं होतं. मिरा भाईंदरची कमान भाजप आपल्या हातात देईल, असा विश्वास गीता जैन यांना होता. मात्र स्थानिक भाजप कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याच्या कारणावरुन गीता जैन नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मिरा भाईंदरच्या ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांचे बर्थडे सेलिब्रेशन

(Mira Bhainder Independent MLA Geeta Jain to join Shivsena Live Update)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ