खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

भाजपच्या माजी नेत्या आणि मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन शनिवारी (24 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजता शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?


मीरा भाईंदर : राज्यातील राजकारणात चांगल्याच उलथापालथी होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांचा ओघ आता उलटा फिरल्याचं दिसत आहे. आधी भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता भाजपच्या माजी नेत्या आणि मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन शनिवारी (24 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजता शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपचे अनेक नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे (MLA Geeta Jain may join Shivsena with BJP corporator in Mira Bhayandar).

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर गीता जैन यांचा शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गीता जैन यांनी याआधी भाजपमध्ये बंडखोरी करत अपक्ष विधानसभा निवडणूक लढली आणि भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. सध्या त्यांच्या संपर्कात अनेक भाजप नगरसेवकही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी या भाजप नगरसेवकांसोबत शिवसेनेत प्रवेश केल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का असेल.

हेही वाचा : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप, भाजपला मोठा धक्का, माजी आमदाराने सर्व पदं सोडली

दरम्यान, मीरा-भाईंदर महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपकडे एकूण 61 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. शिवसेनेकडे 22 आणि काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपकडे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 48 नगरसेवकांपेक्षा अधिक नगरसेवक आहेत. मात्र, गीता जैन यांच्यासोबत भाजप नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यास मीरा भाईंदर महापालिकेतील सत्तेची गणितं देखील हलण्याची शक्यता आहे.

सध्या मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक ज्योती हसनाळे भाजपच्या महापौर आहेत. यानंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सत्तेचं पारडं उलटं फिरण्याचीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे

शिवसेना विश्वासघातकी पक्ष, भाजपच्या माजी आमदाराची टीका

भाजपमधून आमदारासह या चार बंडखोरांची हकालपट्टी

संबंधित व्हिडीओ :

MLA Geeta Jain may join Shivsena with BJP corporator in Mira Bhayandar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI