AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे 61 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. शिवसेनकडे 22, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहे. बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड आहे

मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 26, 2020 | 12:47 PM
Share

मीरा भाईंदर : मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे यांची निवड झाली आहे. ज्योत्स्ना हसनाळे 55 मतं मिळवत विजयी झाल्या. भाजपच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करुनही मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार विराजमान झाला (Mira Bhaindar Mayor Election)

LIVE UPDATE

[svt-event title=”महापौरपदासाठी मतदानाला सुरुवात” date=”26/02/2020,12:00PM” class=”svt-cd-green” ] मीरा भाईंदर महापौर निवडणूक : शिवसेना नगरसेविका दीप्ती भट आणि अनिता पाटील, काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान आणि भाजप नगरसेवक विजय राय अनुपस्थित, महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान सुरु [/svt-event]

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे 61 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. शिवसेनेकडे 22, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहे. बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड आहे. त्यातच शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

मीरा भाईंदर महापौर निवडणूक : काँग्रेस नगरसेविका स्ट्रेचरवरुन महापालिकेत

नगरसेवक फुटू नये, यासाठी भाजपने नगरसेवकांना गोव्यातील ‘हॉटेल ललित’मध्ये ठेवलं आहे. महापौरपदावरुन भाजपमध्ये गटबाजी असल्याची चर्चा आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन या दोन गटात रस्सीखेच होती. मेहता गटाचा भाजप उमेदवार ज्योती हसनाळेंना पाठिंबा आहे. परंतु भाजपमधील 14 नगरसेवक गीता जैन यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं.

हेही वाचामीरा-भाईंदर महापौर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नगरसेविका बेपत्ता

शिवसेनेचे काही नगरसेवक माथेरानमध्ये आहेत. काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान आणि अहमद शेख तर शिवसेनेच्या दीप्ती भट्ट हे नॉट रिचेबल आहेत. महापौर निवडणुकीत चमत्कार घडवणार, असा दावा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

मीरा भाईंदर महापालिकेत मेहता समर्थक ज्योती हसनाळे भाजपच्या महापौर होणार हे निश्चित आहे. परंतु गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले, तर शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mira Bhaindar Mayor Election)

Follow Us
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...