मिरा भाईंदरच्या 'कोरोना'ग्रस्त आमदार गीता जैन यांचे बर्थडे सेलिब्रेशन

मिरा भाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन यांना 'कोरोना'ची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते.

मिरा भाईंदरच्या 'कोरोना'ग्रस्त आमदार गीता जैन यांचे बर्थडे सेलिब्रेशन

मिरा भाईंदर : मिरा भाईंदरमधील ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांनी घरी वाढदिवस साजरा करतानाचे फोटो समोर आले आहेत. होम क्वारंटाईन असताना त्यांनी पतीसह केक कापून सेलिब्रेशन केले. (Mira Bhainder Corona Positive MLA Geeta Jain Birthday  Celebration)

मिरा भाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. गीता जैन आणि त्यांचे पती दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहे. मिरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोघांना होम क्वारंटाईन केले आहे.

5 जुलै रोजी गीता जैन यांचा वाढदिवस होता. दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांनी केक कापून घरात एकमेकांबरोबर वाढदिवस साजरा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले असून अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत.

हेही वाचा : मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण

मिरा भाईंदरमध्ये 10 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची सर्व दुकानेही बंद राहणार आहेत. नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

राज्यात यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित बातम्या : 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

(Mira Bhainder Corona Positive MLA Geeta Jain Birthday  Celebration)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *