MLA corona | मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली (MLA  Geeta Jain Tested Corona Positive) आहे.

MLA corona | मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण

ठाणे : मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार गीता जैन यांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. आमदार गीता जैन यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्या घरी आमदार गीता जैन आणि त्याचे पती दोघेच जण आहेत, अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली. (MLA Geeta Jain Tested Corona Positive)

रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मिरा भाईंदर शहरात कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. संध्याकाळी 5 पासून कडक लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. 10 जुलैपर्यंत मिरा भाईंदरमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची सर्व दुकानेही बंद राहणार आहे. नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत.

मंत्री, आमदारांना कोरोना

राज्यात यापूर्वी अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती.

तिकडे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्या एका आमदाराला कोरोना झाल्याचं निष्पण्ण झालं.

पुण्यातील भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. (BJP MLA  Geeta Jain Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

Pimpari BJP MLA Corona | पिंपरीतील भाजप आमदाराला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह

Published On - 7:44 pm, Wed, 1 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI