Pimpari BJP MLA Corona | पिंपरीतील भाजप आमदाराला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह

कोरोनाग्रस्त आमदार आणि त्याची पत्नी हे दोघे पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

Pimpari BJP MLA Corona | पिंपरीतील भाजप आमदाराला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवड : पुण्यातील भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. (Pimpri Chinchwad BJP MLA Corona Positive)

भाजप आमदारासह त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. आमदार आणि त्याची पत्नी हे दोघे पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

विशेष म्हणजे संबंधित आमदाराने गेल्या आठवड्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वायसीएम रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली होती. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या घरी भोजनही केले होते.

हेही वाचा : राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

दोन दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीलाही भाजप आमदाराने हजेरी लावली होती. हायरिस्क कॉन्टॅक्टमुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

मुंबईच्या महापौर सैफी रुग्णालयात

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांना सकाळपासून ताप असल्याने तपासणीसाठी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. दोन दिवसांपूर्वीही त्यांची वैद्यकीय चाचणी झाली होती. त्यांना ताप आणि अस्वस्थ वाटत असल्याने त्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झाल्या. (Pimpri Chinchwad BJP MLA Corona Positive)

लोकप्रतिनिधीही कोरोनाच्या विळख्यात

चारच दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदारालाही कोरोना झाल्याचं उघड झालं होतं. यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिघांनीही कोरोनावर मात केली आहे.

दुसरीकडे, ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ठाण्यातील कळवा भागातील ते नगरसेवक होते. एक उत्तम बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर ते राजकारणात आले.

(Pimpri Chinchwad BJP MLA Corona Positive)

Published On - 2:26 pm, Mon, 29 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI