AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या एकमेव आमदाराची ‘घरवापसी’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ‘घरवापसी’ निश्चित झाली आहे. उद्या दुपारी 2 वाजता आमदार शरद सोनवणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  मुंबईतील शिवसेना भवनात सोनवणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार […]

राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या एकमेव आमदाराची ‘घरवापसी’
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ‘घरवापसी’ निश्चित झाली आहे. उद्या दुपारी 2 वाजता आमदार शरद सोनवणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  मुंबईतील शिवसेना भवनात सोनवणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल.

शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार होते. त्यामुळे मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कालच म्हणजे 9 मार्च रोजीच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने शरद सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि ते जिंकूनही आले होते. 2014 साली मनसेचे एकमेव आमदार ठरण्याचा मानही त्यांना मिळाला होता.

तीन दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन शरद सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता केली होती.

जुन्नर स्थानिक राजकारणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कडवा संघर्ष आहे. त्यामुळे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने समर्थकांच्या मागणीनुसार निर्णय घेतल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. काल मनसेच्या वर्धापन दिनालाही शरद सोनावणे गैरहजर होते.

कोण आहेत शरद सोनवणे?

  • शरद सोनवणे हे मनसेचे विद्यमान आमदार आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्त्व करतात.
  • मनसेत प्रवेश करण्याआधी ते शिवसेनेत सक्रीय होते.
  • शिवसेनेने 2014 साली त्यांना विधानसभेची तिकीट नाकारल्याने मनसेत प्रवेश करुन निवडणूक लढवली.
  • 2014 साली विधानसभा निवडणूक जिंकलेले सोनवणे हे मनसेचे एकमेव आमदार

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच