AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी राज ठाकरेंची ‘त्रिमूर्ती’

नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या राज ठाकरेंच्या तिघा विश्वासू नेत्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेची जबाबदारी आहे (MNS Raj Thackeray Kalyan Dombivali )

कल्याण डोंबिवलीचा गड जिंकण्यासाठी राज ठाकरेंची 'त्रिमूर्ती'
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 08, 2021 | 8:53 AM
Share

कल्याण डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी वैयक्तिक चर्चा केली. मनसेची गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (MNS Raj Thackeray choses three leaders for Kalyan Dombivali Municipal Election)

मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. आता नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या राज ठाकरेंच्या तिघा विश्वासू नेत्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, गळती रोखणे आणि अधिकाधिक उमेदवारांना विजयी करणे ही जबाबदारी आहे.

आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे

“राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत. लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे… एकच आहे… आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती कि अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की…”, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.

राजेश कदम शिवसेनेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही  थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.

मनसेचे माजी विरोधीपक्ष नेते मंदार हळबे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. (MNS Raj Thackeray choses three leaders for Kalyan Dombivali Municipal Election)

मनसेच्या एकमेव आमदारासमोर आव्हानाचा डोंगर

गेल्या 10 वर्षांपासून मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. शिवसेना-भाजप युती तुटण्याआधी महापालिकेचे विरोधी पक्षपद मनसेकडे होतं. 2010 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते, तर 2015 मध्ये 9 नगरसेवकच विजयी झाले. 2019 च्या विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे डोंबिवलीतून निवडून आले. त्यानंतर मनसेची ताकद वाढणार असे बोलले जात होते. मात्र मनसेला खिंडार पडल्याने येणाऱ्या निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

संबंधित बातम्या :

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

(MNS Raj Thackeray choses three leaders for Kalyan Dombivali Municipal Election)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...