‘एक आहे पण नेक आहे’, आमदार राजू पाटलांच्या समर्थनार्थ बाळा नांदगावकर यांची बेधडक फेसबुक पोस्ट

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठे धक्के बसले. | MNS Bala NandGaonkar Facebook post

'एक आहे पण नेक आहे', आमदार राजू पाटलांच्या समर्थनार्थ बाळा नांदगावकर यांची बेधडक फेसबुक पोस्ट
Bala nandgaonakr And Raj Thackeray And Raju patil

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठे धक्के बसले. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम (Rajesh kadam) यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे (Mandar halabe) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरेंना (Raj thackeray) मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली. अशा सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MNS Mla Raju Patil) काहीसे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे. (MNS Bala NandGaonkar Facebook Post Support For Mla Raju patil over 2 leaders left MNS)

“कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशांना विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना ही कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठ-मोठी पक्षांतरं अनुभवली आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर कायमच श्रद्धा ठेवून कार्यरत असतो”, असं नांदगावकर यांनी फएसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“आमदार राजू पाटील यांच्या समर्थनार्थ पुढे बोलताना नांदगावकर लिहितात, “स्थानिक आमदार राजू पाटील व त्यांचे सहकारी हे सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असतांना काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही. जनता सगळे जाणून आहे. आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पोषक वातावरण आहे. त्यामुळे या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता येणाऱ्या निवडणुकीची कसून तयार करावी”, असा मित्रत्वाचा सल्ला नांदगावकर यांनी राजू पाटील यांनी दिला आहे.

“राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत. लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे… एकच आहे… आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती कि अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की…”, असा विश्वास सरतेशेवटी नांगदावकर यांनी व्यक्त केलाय..

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठी गळती लागण्याची शक्यता होती. गेल्या आठवड्यात कल्यामधील मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश होता. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांच्या शिष्टाईमुळे या कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात यश आले.

(MNS Bala NandGaonkar Facebook Post Support For Mla Raju patil over 2 leaders left MNS)

हे ही वाचा :

शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंसाठी ‘हा’ मराठी अभिनेता पुढे सरसावला

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI