शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंसाठी ‘हा’ मराठी अभिनेता पुढे सरसावला

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मनसेच्या भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. | Sanjay Mone

शिवसेना-भाजपचा मनसेला 'दे धक्का'; राज ठाकरेंसाठी 'हा' मराठी अभिनेता पुढे सरसावला
राज ठाकरे, मनसेप्रमुख


मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना आणि भाजपने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या दोन घटना मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मनसेच्या भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत आता मराठी अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) मनसेची बाजू घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. (Actor Sanjay Mone takes a stand for Raj Thackeray’s MNS)

संजय मोने यांनी फेसबुक पोस्ट करुन मतदारांना जाणता आणि नेणता राजा यामधील फरक ओळखण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊनमध्ये हातात सत्ता नसताना ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना लक्षात ठेवा. ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे,त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की लगेच “मोठी बातमी”असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते. याचा अर्थ त्या पक्षाच्या “असण्याची”सगळे जण दखल घेतात..हो ना? याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा, असे संजय मोने यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठी गळती लागण्याची शक्यता होती. गेल्या आठवड्यात कल्यामधील मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश होता. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांच्या शिष्टाईमुळे या कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात यश आले.

संबंधित बातम्या:

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

(Actor Sanjay Mone takes a stand for Raj Thackeray’s MNS)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI